‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून ईशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविड उत्तम गीतकारही आहे. तिच्या गीताने सजलेला‘झिलमिल’ हा अल्बम नुकताच लाँच झाला. ‘झिलमिल’ अल्बमसाठी आदितीने लिहिलेले गीत बॉलीवूडचे सुप्रसिध्द संगीतकार सलीम मर्चंट ह्यांनी गायले आहे.
आदिती द्रविड ह्याविषयी म्हणते, “मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते, की सलीमसरांनी माझ्या गीताला स्वरसाज चढवला आहे. बॉलीवूडमधल्या अशा एखाद्या नामवंत संगीतकाराने गीत गाण्याची संधी मराठी गीतकारांच्या आयुष्यात खूप कमी वेळेला येते. 2018मध्ये मी करीयरमध्ये मिळवलेल्या अचिवमेंन्ट्स पैकी ही सर्वाधिक आठवणीतली बाब म्हणता येईल.”
आदितीचा काही महिन्यांपूर्वीच रिलीज झालेला ‘यु एन्ड मी’ अल्बमही चांगलाच गाजला होता.