Marathi News

सगळ्यांना पडला जितूचा मार

सिनेसृष्टीत दोन पध्दतीचे कलाकार आहेत…एक, दिग्दर्शकाने दाखवलेली वाट चालणारे आणि दोन, म्हणजे दिग्दर्शकाने सुचवलेल्या वाटेवर चालताना आपल्या उत्स्फूर्तपणाचा अनुभव देणारे…जितेंद्र जोशी त्यापैकीच एक…प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला पोश्टर गर्ल या सिनेमाचे लेखक हेमंत ढोमे आणि दिग्दर्शक समीर पाटील यांना नुकताच हा अनुभव आला. लेखकाने लिहिलेली संहिता दिग्दर्शक समीर पाटील यांनी जितेंद्र ला समजावून सांगितल्यानंतर, त्या भूमिकेला समजून घेत आपल्या चालण्या-बोलण्याच्या पध्दतीत त्याने बदल केल्याचे… समीर पाटील यांनी सांगितले.

तर याविषयी बोलताना हेमंत ढोमे म्हणाले की, भारतराव झेंडे ची भूमिका जितेंद्रला दिल्यानंतर त्याने त्या भूमिकेला समजून घेत…आपल्या पध्दतीने ती परिपूर्ण केली. या चित्रपटात जितेंद्र सतत आपल्याला कुणाला न कुणाला मारताना दिसणार आहे…हे त्याचेच कौशल्य असल्याचे चित्रपटाचे लेखक हेमंत यांनी सांगितले.

या चित्रपटात जितेंद्र गावच्या उपसरपंचाच्या भूमिकेत दिसणार आहे. आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचे भान राखत आपण कसे वरचड आहोत हे दाखवण्यासाठी जितू सगळयांनाच मारत सुटलायं.

या चित्रपटात जितेंद्रबरोबर अनिकेत विश्वासराव, सिध्दार्थ मेनन, संदीप पाठक, अक्षय टंकसाळे, हेमंत ढोमे आणि इतर काही दिग्गज आपल्याला दिसणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button