Home > Marathi News > सई ताम्हणकर निघाली लंडन भारतीय फिल्म फेस्टिव्हलला !

सई ताम्हणकर निघाली लंडन भारतीय फिल्म फेस्टिव्हलला !

Sai Tamankar In Indian Film Festival
Sai Tamankar In Indian Film Festival

आपली फ़ॉरिन फिल्म लव सोनिया ह्या सिनेमासाठी अभिनेत्री सई ताम्हणकर लंडनला निघाली आहे. लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलचे ओपनिंग सईच्या ‘लव सोनिया’ फिल्मने होणार आहे. लव सोनियामध्ये एका महत्वाच्या भूमिकेत दिसणारी सई सिनेमाच्या स्क्रिनींगसाठी लंडनला रवाना होतानाचा मुंबई आंततराष्ट्रीय विमानतळावरचा हा फोटो आहे.

लाइफ ऑफ पाय आणि स्लमडॉग मिलीनियर ह्या सिनेमाचे निर्माते तबरेज नुरानी ह्यांनी लव सोनिया ह्या सिनेमाचे दिग्दर्शन केलेले आहे. लव सोनिया सिनेमामध्ये सई ताम्हणकर सोबत राजकुमार राव, रिचा चढ्ढा, मनोज वाजपेयी, अनुपम खेर हे बॉलीवूड स्टार आणि डेमी मोर आणि फ्रिडा पिंटो ह्या हॉलीवूड अभिनेत्री दिसणार आहेत.

लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलची ओपनिंग फिल्म असलेल्या लव सोनियाबद्दल सई सांगते, “एका सशक्त मुलीची ही कथा आहे. बागरी लंडन फिल्म फेस्टिवल ह्या एका महत्वपूर्ण फिल्म फेस्टिवलचे ओपनिंग ह्या फिल्मने होते आहे. ह्या फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातले सिनेरसिक येतात. त्यामूळे ही नक्कीच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

सई ताम्हणकरच्या लव सोनिया सिनेमाचे शूटिंग मुंबई, जयपूर, हाँगकाँग आणि लॉस एंजलिसमध्ये झाले आहे. लवकरच सप्टेंबरमध्ये ही फिल्म रिलीज होईल.

About justmarathi

Check Also

SHIVANI SURVE

अखेर ‘सातारचा सलमान’च्या 2 नायिका आल्या समोर

‘स्वप्नं बघितली तरच खरी होतात !!’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘सातारचा सलमान’या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित …

Leave a Reply