Marathi News

सई ताम्हणकरला मिळाला प्रतिष्ठित सॅव्ही पुरस्कार !

Sai Tamhankar Outstanding contribution in films
Sai Tamhankar Outstanding contribution in films

सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार हा प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार मिळावा अशी अनेक सेलेब्सची इच्छा असते. असा हा पुरस्कार मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरला मिळाला आहे. नेहमी पेज-थ्री आणि बॉलीवूड सेलेब्सना मिळणारा हा फॅशन जगतात मानाचा मानला जाणारा पुरस्कार सई ताम्हणकरला मिळणं हे नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.

रविवारी पुण्यात झालेल्या सॅवी वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार सोहळ्यामध्ये सई ताम्हणकरला ‘आउटस्टेंडिंग कॉन्ट्रिब्युशन इन फिल्म्स’ ह्या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. सॅव्ही पुरस्कार मिळणारी ती मराठीतली पहिली अभिनेत्री आहे.

सईने आपल्या दहा वर्षांच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या करीयरमध्ये जवळजवळ 50 चित्रपट केले अनेक नावाजलेले पुरस्कार मिळाल्यावर आता सॅव्ही पुरस्कारानेही तिचा गौरव झाला.

ह्यावर प्रतिक्रिया देताना सई ताम्हणकर म्हणते, “मी खूप खूश आहे. आणि मी स्वत:ला भाग्यवान समजते की, मी एक स्वतंत्र स्त्री आहे. जी स्वत:चे निर्णय स्वत:घेऊ शकते. सॅव्हीने दिलेल्या ह्या पुरस्काराबद्दल मी त्यांची आभारी आहे. अशा पुरस्कारांमूळे आत्मविश्वास अजूनच वाढतो. ही शाबासकी अजून काम करण्याची उर्जा देते. प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार सॅव्हीने मला दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. माझ्या मते, ही तर फक्त सुरूवात आहे. माझ्या कुटूंबाला आणि चाहत्यांना माझा गर्व वाटावा, असेच काम मी यापूढेही करत राहेन.”

लवकरच लंडनमध्ये सुरू होणा-या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सई ताम्हणकरची इंडो-वेस्टर्न फिल्म ‘लव सोनिया’ दाखवली जाणार आहे. ह्या फिल्म फेस्टिवलची लव सोनिया ओपनिंग फिल्म असेल. त्यासाठी सई ताम्हणकर ह्या आठवड्यात लंडनला रवाना होईल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button