सई ताम्हणकरच्या पाँडेचरी चित्रपटाचे पहिले पोस्टर झाले रिविल

सई ताम्हणकरच्या - पाँडेचरी चित्रपटसई ताम्हणकरची फिल्म ‘पाँडेचरी’चे चित्रीकरण 1 फेब्रुवारी पासून पाँडेचरीमध्ये सुरू झाले आहे. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी सईचे पोस्टरही रिविल करण्यात आले आहे. ह्या पोस्टरमध्ये सईचा ब्लॅक एन्ड व्हाइट नो मेकअप लूक उठून दिसतो आहे.

पाँडेचरी सिनेमाविषयी सई ताम्हणकर म्हणते, “ही पहिली फिल्म आहे जी आयफोनवर शूट करण्यात येणार आहे. माझ्या भूमिकेचा लूक खूप नॅचरल आहे. नो-मेकअप, नो-हेअरस्टाइल लूकमध्ये मी ह्यात दिसेन. संपूर्ण चित्रपट पाँडेचरीत चित्रीत होईल. सिनेमाची प्रोसेस मी एवढी एन्जॉय करतेय की, पहिल्यांदाच एखाद्या कार्यशाळेला जात असल्यासारखी छान भावना आहे. प्रत्येक अभिनेत्रीच्या आयुष्यात अशी फिल्म यायला हवी, जेव्हा तुम्ही तुमच्या कम्फर्टझोनमधून बाहेर निघून काहीतरी वेगळं करता. त्यामूळे सध्या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी मी खूप उत्सुक आहे.”

सचिन कुंडलकर आणि सई ताम्हणकर ह्याची ही एकत्र दूसरी फिल्म आहे. ह्याअगोदर 2016मध्ये सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार चित्रपटामध्ये सई ताम्हणकरने काम केले होते. सिनेमातली भूमिका चांगली वठवता यावी, ह्यासाठी सईने 10-15 किलो वजनही वाढवले होते.

आता तीन वर्षांनी दोघेही एकत्र काम करत आहेत. त्यात सईचा नो-मेकअप रिएलिस्टिक लूक सईच्या ह्या नव्या भूमिकेविषयी उत्कंठा वाढवणारा आहे. त्यामूळे पाँडेचरीविषयी सध्या सईच्या चाहत्यांना आतूरता आहे.

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply