Marathi News

संजय जाधव ह्यांच्या ‘खारी बिस्कीट’ ला MFK मध्ये सर्वाधिक नामांकनं

Khari Biscuit Marathi Movie
Khari Biscuit Marathi Movie

फिल्ममेकर संजय जाधव ह्यांची 50 वी कलाकृती असलेल्या ‘खारी बिस्कीट’ चित्रपटाला सध्या संपूर्ण महाराष्टात भरघोस प्रतिसाद मिळतोय. ब-याच काळानंतर मराठी सिनेमासाठी ‘हाउसफुल’चे बोर्ड सर्वत्र झळकतायत. रसिकांच्या ह्या प्रेमापोटीच खारी बिस्किटला ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ ह्या पुरस्कांरांमध्ये एक नाही, दोन नाही तर तब्बल ९ नामांकने मिळाली आहेत.

खारी बिस्कीट सिनेमाला ‘फेवरेट चित्रपट’ तसेच संजय जाधव यांना ‘फेवरेट दिग्दर्शक’ यासाठी नामांकन मिळाले आहे. अभिनेता संजय नार्वेकर आणि अभिनेत्री नंदिता धुरी-पाटकर यांना अनुक्रमे ‘फेवरेट सहाय्यक अभिनेता’ आणि ‘फेवरेट सहाय्यक अभिनेत्री’ ही नामांकने आहेत. तर ह्या सिनेमातील ‘तुला जपणार आहे’, आणि ‘खारी’ ह्या दोन्ही गाण्यांना ‘फेवरेट गीत’ गटात नामांकने मिळाली आहेत. ‘फेवरेट गायक’ म्हणून कुणाल गांजावाला (खारी) आणि आदर्श शिंदे (तुला जपणार आहे) तसेच गायिका रोंकिनी गुप्ताला (तुला जपणार आहे) गाण्यासाठी फेवरेट गायिका म्हणून नामांकन मिळालं आहे. अशा पध्दतीने खारी बिस्कीट सिनेमाला सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत.

ह्याविषयी प्रतिक्रिया देताना फिल्ममेकर संजय जाधव म्हणाले, “खरं तर MFK अॅवॉर्डकरीता नामांकन मिळणे ही नेहमीच आनंदाची गोष्ट असते. आपण बनवलेला सिनेमा रसिकांच्या पसंतीस उतरलाय, ह्याचीच दाद ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ मधून मिळते. यंदा अनेक चांगले-चांगले सिनेमे झळकले. अशा सिनेमांमध्ये खारी बिस्कीटला नामांकन मिळणे, हे कौतुकाची थाप मिळाल्यासारखे आहे. २०१३ला माझ्या ‘दुनियादारी’ सिनेमाला MFK मध्ये पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर ‘येरे येरे पैसा’ सिनेमालाही MFKममध्ये अवॉर्ड्स मिळाले होते. आणि आता ‘खारी बिस्कीट’ला नामांकने मिळाली आहेत. त्यामुळे मी खूप उत्साहित आहे.”

झी स्टुडियोज प्रस्तुत, ड्रिमींग ट्वेंटींफोरसेवन निर्मित, दिपक पांडुरंग राणे निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित खारी बिस्कीट1 नोव्हेंबर 2019ला सिनेमागृहांमध्ये झळकला आहे. सध्या भरघोस प्रतिसादात हा चित्रपट सर्वत्र चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button