Marathi News

संजय जाधव यांच्या लकी चित्रपटाला महाराष्ट्रभरातून तरूणांचा भरघोस प्रतिसाद

Luckee Poster new

 

बी लाइव्ह प्रस्तूत संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपट 7 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासून सध्या कॉलेज तरूणांचा सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

ह्याविषयी सिनेमा एक्जिबिटर्स म्हणतात, “लकी-जियाची लव्हस्टोरी कॉलेज तरूणांना आपलीशी वाटतेय. लकीचे संवाद युवावर्गाला आवडतायत. बाकी लव्हस्टोरीजमधले नायक-नायिका हे कॉलेजमध्ये जाणारे वाटत नाहीत. पण ह्या लव्हस्टोरीचे वैशिष्ठ्य आहे की, लकी कपलचीही फ्रेश जोडी असल्याने ती कॉलेजमधली वाटते. आणि त्यांची लव्हस्टोरी कॉलेज युवकांना पाहावीशी वाटते.

युवावर्गाच्या ह्या भरघोस प्रतिसादाबद्दल फिल्ममेकर संजय जाधव म्हणतात, “खरं तर, मराठी सिनेमा फक्त शनिवार-रविवार फॅमिली ऑडियन्समूळे चालतो असं म्हणतात. पण लकीला मधल्यावारीसूध्दा जो प्रतिसाद मिळालाय, त्यामूळे आनंद होतोय. कॉलेजच्या तरूणांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”

निर्माते सुरज सिंग म्हणतात, “लकी हा माझा पहिलाच मराठी  सिनेमा आहे. पण आता प्रेक्षकांनी तो उचलून धरल्यामूळे अजून मराठी सिनेमे बनवण्याचा आत्मविश्वास आलाय. सिनेमा युवावर्गाविषयी आहे. आणि तो कॉलेज युवक- युवतींना आवडतोय, ह्याचा मला आनंद आहे.”

लकी म्हणजेच अभय महाजन ह्याविषयी सांगतो, “आजच्या संभ्रमित तरूणांविषयीची कथा आहे. इतरांसाठी लकी आणि स्वत:साठी अनलकी असलेला हा कॉलेज तरूण आपल्या निरागसतेने सिनेमामध्ये सर्वांचे मन जिंकून घेतो. आणि मला असं वाटतं, आज प्रेक्षकांना हिच गोष्ट आकर्षित करतेय. आजच्या युवावर्गाची ही प्रातिनिधिक कहाणी आमच्या वयोगटातल्या तरूणांना आवडतेय, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.”

जिया म्हणजेच अभिनेत्री दिप्ती सती म्हणाली, “सिनेमाला सब-टायटल्स आहेत. त्यामूळे अनेक अमराठी प्रेक्षकही सिनेमा पाहू शकतायत. माझ्या काही अमराठी मित्र-मैत्रिणींनी लकी सिनेमा पाहिला. आणि त्यांची हसूनहसून मुरकुंडी वळलेली पाहून मी नक्कीच म्हणू शकेन, की हा चित्रपट आजच्या काळाचा आहे आणि तो पाहायला भाषेचे बंधन नाही. त्यामूळे ह्या व्हॅलेन्टाईन्स डे ला आपल्या प्रेयसी, प्रियकर, किंवा मित्र-मैत्रिणींना घेऊन तुम्ही सिनेमा पाहायला जाऊ शकता.”

 बी लाइव्ह प्रॉडक्शन्स प्रस्तूत ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ चित्रपटात दिप्ती सती आणि अभय महाजन मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा 7 फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button