‘वृंदावन’ च्या राकेशला मिळाली बॉलीवूडकडून शाबासकी
हिंदी मालिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा राकेश बापट सध्या खूप खुश आहे. जबरदस्त अॅक्शन, ड्रामा आणि एंटरटेनमेंटचा भरपूर मसाला असलेल्या वृंदावन सिनेमात राकेश मुख्य भूमिका साकारत आहे. राकेशची ही पहिलीच अॅक्शन फिल्म असून त्याने दिलेल्या फाईट सिक्वेन्सला हिंदी -सिनेसृष्टीच्या लाकारांकडून दाद मिळत आहे. या चित्रपटात राकेशने केलेल्या स्टंट ची चक्क बॉलीवूड कलाकारांनी दखल घेतली आहे. यापूर्वी सलमान खानकडून कौतुकाची थाप मिळालेल्या राकेशला आता किंग खान शाहरुखने देखील चीअर अप केले आहे. एवढेच नाही तर वरुण धवन, जॉन अब्राहम यांनी राकेशच्या अभिनयाचे कौतुक केलं आहे.
मनोरंजनाचा कम्प्लीट पेकेज असणा-या या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर पाहिल्यानंतर हा सिनेमा सुपरहिट असल्याची प्रतिक्रिया प्रत्येकाने दिली. वृदावन या सिनेमाची ‘रिअलस्टिक फिल्म कंपनी’ या बॅनरखाली निर्मिती करण्यात आली असून राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पूर आणि जिगर कडकिया यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. तर अनघा कारखानीस आणि कारखानीस यांनी सहनिर्मितीची धुरा सांभाळली आहे. गणेश आचार्य यांनी सिनेमातल्या कलाकारांना आपल्या इशाऱ्यांवर नाचवलं असून अमितराज यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. गुढीपाडव्याला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे