Marathi News

विकता का उत्तर ची उत्सुकता शिगेला स्टार प्रवाहवर ७ ऑक्टोबरपासून सुरुवात

Ritesh Deshmukh
Ritesh Deshmukh

स्टारअभिनेता रितेश देशमुख प्रथमच छोट्या पडद्यावर, भाव करण्याची अनोखी स्पर्धा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्वसामान्यांना सेलिब्रेटी बनवणारा गेमशो म्हणून’विकता का उत्तर’ ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हा गेम शो ७ऑक्टोबर पासून शुक्रवार ते रविवार संध्याकाळी साडे सात वाजता स्टारप्रवाहवर सुरू  होत आहे.

मराठी टेलिव्हिजनवर आतापर्यंत अनेक गेमशो  आले. मात्र, ‘विकता का उत्तर’ हा त्या सर्वां पेक्षा नक्कीच वेगळा आहे. जिंकण्यासाठी भाव करावा लागणंया अनोख्या संकल्पनेर हा गेम शो बेतला आहे. मराठी माणसाला व्यवसाय कळत नाही, मराठी माणसांत जिंकण्याची वृत्ती नाही अशा सगळ्या टीकांना हा गेम शो उत्तर देणार आहे.बुद्धिमत्ताआणि भाव करण्याचं कौशल्य या गेम शो मध्ये पणाला लावावं लागणार आहे. त्यासाठी स्पर्धकाला  ६० भाव करणाऱ्या कलाकारांशी चुरसकरावी लागेल. या गेम शोचं वेगळेपण म्हणजे, यातील स्पर्धकाबरोबरच त्याच्याबरोबर उत्तरासाठी भाव करणारी व्यक्ती ही जिंकू शकणार आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस स्पर्धकापेक्षा भाव करणारी व्यक्ती जास्त रक्कम जिंकू शकते. त्यामुळे भाव करण्याचं कौशल्य असलेले स्पर्धक’ आता थांबायचं नाय’ म्हणत या गेम शो मध्ये सहभागी होत आहेत. आता या खेळात नेमकं काय घडतं, कोण जास्त रक्कम जिंकतं, त्यासाठी ही लाखो रुपये जिंकण्याची संधी देणारा गेम शो नक्कीच पहावा लागेल.

भारतीय टेलिव्हिजनला एकाहून एकसरस गेमशो दिलेल्या सिद्धार्थ बसूयांच्या बिगसिनर्जीने ‘विकताकाउत्तर’ चं आरेखन आणि निर्मिती केली आहे. या गेम शो च्या निमित्तानं लेखकांची उत्तम भट्टी  जमून आलीआहे. अभिनेता ,लेखक दिग्दर्शक असलेला ह्रषिकेश जोशी, कवी-गीतकार वैभव जोशी, अभिनेत्री लेखिका मुग्धा गोडबोले-रानडे आणि लेखिका पल्लवी करकेरा हे चौघंया कार्यक्रमाचं लेखन करत आहेत.

बॉलीवूड  आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडून रितेश देशमुख दणक्यात छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. छोट्या पडद्यावरील पदार्पणाबाबत आणि  गेम शो बाबत रितेश देशमुखम्हणाले,’ छोट्या पडद्यावर पदार्पण करणं माझ्यासाठी आनंददायी आहे. तसंच हे पदार्पण स्टार प्रवाहवरून होणं माझ्यासाठी खास आहे. हा खेळ नक्कीच वेगळा आहे. त्या बरोबरच मला महाराष्ट्रातल्या सर्व सामान्यांशी संवाद साधता येणार आहे, त्यांच्या भावभावना जाणून घेता येणार आहे ही आनंदाची बाब आहे. एकूणच, छोट्या पडद्यावर येण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.’

‘स्टार प्रवाह’चं नवं ब्रीद

‘आता थांबायचं नाय!’
जगभरात आघाडीवर असलेल्या स्टार नेटवर्कनं ‘स्टार प्रवाह’च्या रुपानंमराठी दूरचित्रवाणी क्षेत्रात पदार्पण करून अल्पावधीतच स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. वैविध्यपूर्ण विषय आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या कलाकृतींतून रसिकप्रेक्षकांचं परिपूर्ण मनोरंजन केलं.

समृ्द्ध मराठी संस्कृती जोपासतानाच ‘स्टार प्रवाह’ एक पाऊल पुढे टाकून अवघ्या महाराष्ट्राला आवाहन करत आहे ‘आता थांबायचं नाय!’

पारंपरिक विचारसरणीमुळे मराठी माणूस धोका पत्करत नाही. आजच्या तरुणाईमध्ये बंदिस्त झाल्याची, अडकल्याची भावना आहे. मराठी माणसाची हीच भिडस्त प्रवृत्ती प्रगतीच्या नवनव्या वाटा आजमावून पाहण्यातला मोठा अडथळा ठरते आहे.

या प्रवृत्तीला आणि मनोभूमिकेला आव्हान देऊन मराठी माणसांत, तरूणाईत आणि पर्यायानं महाराष्ट्रात उत्साह, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सशक्त कथानक आणि दमदार व्यक्तिरेखांच्या मालिका घेऊन येत आहे. मराठी दूरचित्रवाणीमध्ये नवा पायंडा पाडत आहे.

आपल्या संस्कृतीच्या मुळाशी घेऊन जात असतानाच काळानुरुप होणारे बदल स्वीकारत आधुनिक विचारही मांडत आहे.जुनाट विचारांना झुगारून देत  नवी स्वप्न पाहून ती पूर्ण करण्यासाठी मराठी माणूस आणि महाराष्ट्र किती धडपड करू शकतो, यशाची नवी क्षितिजं गाठू शकतो हे ‘स्टार प्रवाह’ दाखवून देईल. शिक्षण, करिअर, व्यापार, नातेसंबंध अशा सर्वच क्षेत्रात मराठी माणूस नक्कीच अग्रेसर राहील.
या पुढे यशाची शिखरे पादाक्रांत करण्यासाठी अधिक आत्मविश्वासानं पाऊल टाकेल…म्हणूनच अवघ्या महाराष्ट्राला आवाहन आहे….आता थांबायचं नाय

Related Articles

Leave a Reply

Back to top button