वायकॉम18 मोशन पिक्चर्सचा पोश्टर गर्ल 12 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित

with_logo

मुंबई : झपाटलेला 2 आणि गंगुबाई नॉनमॅट्रीकच्या धमाकेदार यशानंतर आता वायकॉम18 मोशन पिक्चर्स आपल्यासाठी घेऊन येत आहे ‘पोश्टर गर्ल’. सामाजिक व्यंगावर विनोदी अंगाने भाष्य करणारा हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजेचं 12 फेब्रुवारी 2016 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठीतली ग्लॅम डॉल सोनाली कुलकर्णी, जितेंद्र जोशी, ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव आणि सिध्दार्थ मेनन अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली आहे. समाजातल्या संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले आहे. एका विलक्षण गावाची कथा मांडणाऱ्या या चित्रपटाचं संगीत अमित राज यांचे आहे.

“मराठी चित्रपटांचे प्रकाशक आणि वितरक यांच्या उत्कृष्ट समर्थनामुळे मराठी चित्रपट मोठमोठी शिखरे सर करण्यात यशस्वी होत आहेत. मराठी चित्रपट चाहत्यांनी नेहमीच चांगल्या विषयांना प्राधान्य दिले आहे. अशाचं एका वेगळ्या विषयावर बेतलेला पोश्टर गर्ल आम्ही घेऊन येत असल्याचे,” वायकॉम18 मोशन पिक्चर्स चे सीओओ, अजित अंधारे यांनी म्हटले आहे.  हिंदी आणि इंग्रजी मनोरंजन विश्वात मैलाचा दगड पार केल्यानंतर वायकॉम18 आता मराठी सिनेविश्वातही आपली ओळख निर्माण करू इच्छित आहे. लेखक हेमंत ढोमे यांनी लिहिलेली पोश्टर गर्ल मनोरंजनाबरोबरचं सामाजिक समस्यांवर जरूर प्रकाश टाकेल असं म्हणत, या चित्रपटासाठी वायकॉम18 अत्यंत उत्साही असल्याचे ते म्हणाले.

“मनोरंजन विश्वात एका वेगळ्या उंचीवर असणाऱ्या वायकॉम18 मोशन पिक्चर्स आणि चलो फिल्म बनायें यांच्याबरोबर मी माझा दुसरा चित्रपट ‘पोश्टर गर्ल’ करत असल्याचा आनंद व्यक्त करत, जबाबरदारी वाढल्याचे, दिग्दर्शक समीर पाटील यांनी म्हटले आहे.

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply