लव यु जिंदगी” हा लावणारा कुटुंबप्रधान चित्रपट आहे

love u zindagi

 

स्वतःच्या मस्तीत आयुष्य जगणारे कायम सगळ्यांमध्ये उठून दिसतात. हा उत्साह, हा जल्लोष तेव्हाच येतो जेव्हा त्या व्यक्तीचं आयुष्यावर मनस्वी प्रेम असतं. जो स्वतः मनस्वी असतो, ज्याचंस्वतःवर आणि जीवनावर प्रेम असतं. या विषयावरच “लव यु जिंदगी” हा सगळ्यांना कुठेतरी ‘रिलेट’ करायला लावणारा कुटुंबप्रधान चित्रपट आहे.

मुलीचं लग्न ठरलंय म्हणून स्वतःवर जबरदस्तीने “काली प्रौढत्व”  न लादणाऱ्या अनिरुद्ध दातेची ही गोष्ट आहे. खरे पाहता ही फक्त अनिरुद्ध दातेचीच ही गोष्ट नाही, तर प्रत्येक पालकाची,जिंदादील व्यक्तीची ही कथा आहे.

 मुलीचा किंवा मुलाचा विवाह होतो तेव्हा एका रात्रीतून त्या मुलाच्या किंवा मुलीच्या मानसिक स्तरावर काहितरी बदल होतो, एक वेगळीच परिपक्वता आणि हुरहूर जाणवू लागते. पण एकावडिलांच्या मुलीचं लग्न ठरतं किंवा होतं तेव्हा त्यांच्यातही एक मानसिक स्तरावर सूक्ष्म बदल होत असतो. त् अश्यावेळी मागे  बघून त्यांच्याकडून आयुष्याची आजवरची बेरीज वजाबाकी केलीजाते. काहीतरी सुटलंय मागे, ही जाणीव मनाला होते. काहीजण, कशाला बहुतेकजण, “आयुष्य असंच असतं, चालायचंच म्हणून ते स्वीकारतात. मुला मुलींच्या आयुष्याला आपलं आयुष्य समजून“बॅक फूट” वर येऊन जगू लागतात. आजूबाजूचे लोक, कुटुंबीय, मित्र वय झाल्याची सतत जाणीव करून देत असतात. यानंतर ठराविक आयुष्य जगण्याचे सल्ले देतात. पण क्वचित कोणीतरी मागेराहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करायचा विचार करतो. आयुष्य पुन्हा एकदा नव्या पद्धतीने “फ्रंट फूट” येऊन जगायचा निर्णय घेतात आणि तसं जगण्याचा प्रयत्नही करतो.

“लव यु जिंदगी” या चित्रपटातुन हाच संदेश जातो. एक सकारात्मक, टवटवीत विषयावरील चित्रपट मनाला आनंद देऊन जातो. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मनोज सावंत यांचं आहे. दिग्दर्शकम्हणून त्यांचा हा प्रथम चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती एस. पी. प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि एस. पी. एंटरप्राइजेज यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचे निर्माते सचिन बामगुडे यांनीचित्रपटाची ही दुहेरी बाजू समर्थपणे सांभाळली आहे.

चित्रपटात अनिरुद्ध दाते यांची भूमिका सचिन पिळगावकर यांनी केली आहे. त्यांच्याशिवाय आणखी कोण या भूमिकेला न्याय देऊ शकणार! अनिरुद्ध दातेच्या बायकोच्या भूमिकेत कविता लाडमेढेकर आहेत. त्यांनी आपल्या भूमिकेला सुरेख न्याय दिलाय. प्रार्थना बेहरेला ‘रिया’च्या टवटवीत भूमिकेत बघताना छान वाटतं. याशिवाय अतुल परचुरे आणि समीर चौघुले यांनी नेहमीप्रमाणेआपल्या सहज अभिनयाने आपापल्या भूमिकेला सजवलं आहे. चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन समीर सापतिस्कर यांनी केलंय. चित्रपटाला साजेसं छायाचित्रण  पराग देशमुख यांचं आहे.पार्श्वगायनाची धुरा अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी सांभाळली आहे. लव यु जिंदगी चित्रपटाची पटकथा श्रीपाद जोशी आणि मनोज सावंत तर संवाद गणेश पंडित आणि श्रीपाद जोशीयांनी लिहिले आहेत. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला “लव यु जिंदगी” ११ जानेवारीला  महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय.

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply