माझ्यासाठी माझे बाबा जादूगारच – मयुरी देशमुख

“बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतः च्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झ़टणार अंतःकरण…”
या चारोळी मध्ये सांगितल्या प्रमाणेच माझे बाबा आहे. ह्या ओळी त्यांना खऱ्या अर्थाने माझ्या किंबहुना या जगातील सर्वच वडिलांना अगदी साजेशा आहेत.
माझ्यासाठी माझे बाबा म्हणजे एक जादूगारच आहे. लहानपणा पासूनच त्यांनी आम्हाला मोठे केले, आमच्यावर जे संस्कार केले, आम्हाला काय हवे काय नको ते सर्व त्यांनी पाहिले. नुसते लाड नाही केले तर, चांगल्या वाईट सर्वच गोष्टी त्यांनी अगदी योग्य पद्धतीने आम्हाला समजून सांगितल्या. माझे बाबा आमच्यासाठी एक आदर्श बाबा आहे. आज माझे जेव्हा जेव्हा कौतुक होते तेव्हा मी त्याचे श्रेय माझ्या वडिलांनाच देते. बाबांमुळे मला खूप चांगल्या सवयी लागल्या. त्यातलीच एक सवय म्हणजे माणसं जमा करण्याची.
या सवयीमुळे मी लोकांच्या बाबतीत खूप श्रीमंत आहे. इतकी माणसं मी जमवली आहे. त्यासाठी त्यांचे खूप आभार. माझ्या लग्नाच्या वेळेस घरात खूप कल्ला असायचा यातही माझे बाबा अगदी काळजीपूर्वक आणि नीटनेटक्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळत होते. बाबांच्या अशा छोट्या, मोठ्या अगणित आठवणी माझ्या स्मरणात आहे. माझे बाबा फक्त मी किंवा माझ्या परिवारापुरतेच मर्यादित नाहीये. त्यांचे मित्र, आमचे सर्व नातेवाईक, शेजारचे सर्वांसाठीच बाबा नेहमी मदतीसाठी तयार असतात. बाबांनी आमच्यासाठी अविरत कष्ट केले पण,आता वेळ बदलली आहे. त्यांनी त्यांचे सर्व कर्तव्य अगदी योग्य रितीने पार पाडले आहे. म्हणूनच बाबांनी आता खूप आराम करावा, त्याच्या ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत त्यांनी त्या सर्व गोष्टी आता कराव्या आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. अशीच आमची इच्छा आहे. सगळ्यांना ‘फादर्स डे’ च्या हार्दिक शुभेच्छा.
मयुरी देशमुख अभिनेत्री




Leave a Reply
You must be logged in to post a comment.