मराठ मोळी अमृताचा झलक मध्ये गेस्ट अपिअर्न्स

मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमडाॅल अमृता खानविलकर नुकतीच नच बलिये ७ची विजेती ठरली. अमृता एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबतच ती उत्तम नृत्यांगना आहे. गोलमाल या चित्रपटातून आपल्या करिअर ची सुरवात करणाऱ्या अमृताला नटरंग चित्रपटातल्या जाऊ द्या न घरी लावणीतून प्रचंड लोकप्रियता मिळाली. नृत्यावर आधारित असलेल्या अनेक डान्स रिआलिटी शो मधून आपल्याला तिच्या नृत्याची झलक पाहायला मिळाली. नच बलिये ७ मध्येही तिने स्वतः तर नृत्यावर विशेष मेहनत घेतली पण त्यासोबतच ती हिमांशूची स्ट्रीक टीचर झाली. आणि आता पुन्हा एकदा झलक दिख ला जा या डान्स रिआलिटी शो मधून भेटणार आहे. झलकच्या तीन का तडका या कन्सेप्टच्याआधारे सेलिब्रेटी गेस्ट एन्ट्री होणार आहे. आणि सेलिब्रेटी गेस्ट म्हणून अमृता खानविलकर स्पर्धक नेहा मर्दा आणि कोरीग्राफर रजित यांच्यासोबत परफॉर्म करणार आहे. बेहेने दे या रावण सिनेमातल्या गाण्यावरती हे तिघे नृत्य करणार असून तीन नद्यांचा संगम या नृत्यातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.झलक दिखला जा हा भाग आपल्याला येत्या शनिवारी ९ वाजता दाखवण्यात येणार आहे. येत्या वर्षात आपल्याला अमृताचे बिग बजेट सिनेमे पाहता येणार आहेत. त्यापैकी अमृता कट्यार काळजात, वन वे तिकीट, ऑटोग्राफ या सिनेमांमध्ये आपण अमृता पाहणार आहोत.



Leave a Reply
You must be logged in to post a comment.