मराठी सिनेसृष्टीने केले ‘पांडू’ आणि ‘वन्स अ ईअर’ वेबसिरीजचे कौतुक


भारताचा अग्रगण्य स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म असलेला एमएक्स प्लेअरवर २० सप्टेंबरपासून अनुषा नंदा कुमार आणि सारंग साठे दिग्दर्शित ‘पांडू’ आणि मंदार कुरुंदकर दिग्दर्शित ‘वन्स अ ईअर’ या दोन मराठी ओरिजनल्स वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तत्पूर्वी या दोन्ही वेबसिरीजचा स्पेशल स्क्रीनिंग सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला.
यावेळी ‘पांडू’ आणि ‘वन्स अ ईअर’ या दोन्ही वेबसिरीजमधील कलाकार, दिग्दर्शक यांच्यासह हिंदी मधील प्रसिद्ध दिग्दर्शक पॅट्रीक ग्राहम, संतोष जुवेकर, अमेय वाघ, सागर देशमुख, नेहा शितोळे, संदीप कुलकर्णी, गिरीजा ओक, नेहा जोशी, सिद्धार्थ मेनन, अलोक राजवाडे, तृप्ती खामकर, शिखा तलसानिया, सुहृद गोडबोले, जितेंद्र जोशी, सुव्रत जोशी, मिलिंद जोग आदी मराठी आणि सिनेसृष्टीतील मान्यवर आणि कलाकारांनी या सोहळयाला उपस्थित राहून दोन्ही वेबसिरीजसाठी शुभेच्छा देत सर्वांच्या कामाचे कौतुक केले.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.