Marathi News

मराठी चित्रपटसृष्टीतील नवा ऍक्शन हिरो!!!

विकास बांगर
विकास बांगर
२२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणा-या मराठी उन्मत्त थरारपटातून एक हँडसम मार्शल आर्टिस्ट पदार्पण करतोय, ज्याचं नाव आहे विकास बांगर. 
त्याचं झालं असं की, उन्मत ह्या साय-फाय विज्ञानपटामधे फाईट सीन शूट करायचे होते.. सगळे फाईट सिक्वेन्स खरे वाटण्यासाठी कुठल्याही वायर वर्क्सचा वापर करायचा नाही असं दिग्दर्शक महेश राजमाने ह्यांनी ठरवल्यामुळं कलाकारांची मोठी परीक्षाच होती.. महेश राजमाने ह्यांनी त्यांच्या ह्या आधीच्या म्हणजे मुक्काम पोस्ट धानोरी ह्या चित्रपटात सगळे स्टंट्स स्वतःच केले होते.. त्यामुळं सगळे फाईट सीन्स खरेच वाटले पाहीजे ह्याकडे राजमाने स्वतः जातीनं लक्ष घालत होते. त्यात भावेश जोशी ह्या चित्रपटाचे स्टंट आणि फाईट कोरीओग्राफर प्रतीक परमार हे उन्मत्तच्या फाईट कोरीओग्राफ करत असल्यामुळं प्रत्येक फाईट जिवंत झाली आहे.
ह्या चित्रपटात लीड रोल केलेला विकास बांगर हा चीन इथुन कुंगफू आणि चीन बॉक्सींगचं प्रशिक्षण घेऊन आलाय आणि प्रमुख भुमिकेत असलेली आरुषि ही मार्शल आर्टची कुशल फायटर आहे.. हे सगळे कलाकार चित्रपटातला प्रत्येक सीन इतका समरसून करत होते की एका फाईट सीनच्या दरम्यान विकासला इजा झाली.. इजा म्हणजे नुसतं खरचटणं किंवा मुका मार नाही तर त्याला तब्बल नऊ टाके पडले..
अर्थात इतकी मोठी जखम होऊनही पठ्ठ्याच्या चेह-यावर वेदनेऐवजी आनंदच होता.. कारण सीन उत्तम वठल्याची शाबासकी त्याला दिग्दर्शकाकडून मिळाली होती.. हे असे कलाकार उन्मत्तमधे असल्यानं चित्रपट चांगलाच होणार ह्याची महेश राजमाने ह्यांना खात्रीच होती..
विकास हा मूळचा बीड जिल्ह्यातील अभिनेता असून त्याने नसिरुद्दीन शाह यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवले आहेत. उन्मत्त या चित्रपटासाठी त्याची निवड तब्बल 1000 मुलांमधून करण्यात आली होती.. या चित्रपटासाठी मार्शल आर्टस् येणारा अभिनेता दिग्दर्शकाला हवा असल्यामुळे त्यांनी १००० मुलांची ऑडिशन घेऊन त्यांच्यामधून विकासची निवड केली.
फक्त फाईट सीन्सचं नाहीत तर उन्मत्त ह्या चित्रपटात स्पेशल इफेक्टही अप्रतीम झाल्याचं ट्रेलर वरुन समजतय. त्यात असलेला अंडरवॉटर सीन तर हॉलीवूडपटाला तोडीस तोड असाच आहे.. ह्या चित्रपटाची कथाही सायन्स फिक्शन ह्या सदरात मोडणारी असून त्याच्या ट्रेलरची सगळीकडेच चर्चा आहे.. थोडक्यात उन्मत्त हा विज्ञानपट पाहायलाच हवा..

Related Articles

Leave a Reply

Back to top button