बिगबॉसच्या घरात साजरा झाला वैशाली म्हाडेचा वाढदिवस
सुमधूर गळ्याची महागायिका वैशाली म्हाडेचा 21 ऑगस्टला वाढदिवस असतो. एक दिवस अगोदर मंगळवारी बिग बॉस मराठीच्या घरात काही वेळासाठी परतलेल्या वैशाली म्हाडेचा वाढदिवस तिच्या मानलेला भावाने शिवने साजरा केला. शिवने हातात असलेला ब्रेडचा तुकडा केक म्हणून तिला कापायला सांगून तिच्या वाढदिवसाचा आनंद साजरा केला.
वैशालीचे बिग बॉसच्या घरात अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे ह्यांच्याशी ऋणानुबंध जुळले. अभिजीत आणि शिवला वैशालीने मनापासून भाऊ मानले. रक्षाबंधनच्या दिवशी बाहेर असलेल्या अभिजीतला वैशालीने राखी बांधली. पण शिवला राखी बांधायची इच्छा तिने बिग बॉसच्या घरात जाऊन पूर्ण केली. शिवला राखी बांधतानाच मोठ्या बहिणीच्या प्रेमाने त्याला तिकीट टू फिनाले देऊनही त्याला आपल्यापरीने सेफ करण्याचे काम केले.
सूत्रांच्या माहितीनूसार, वैशाली म्हाडेचे पारदर्शक व्यक्तिमत्वच बिग बॉसमधून दिसून आले आहे. तिचा आवाज जसा गोड आहे, तसाच तिचा स्वभावही निर्मळ असल्याचेच दिसून आलेय. आणि ती जी नाती जोडते, ती किती मनापासून असतात. ते पून्हा एकदा मंगळवारी दिसले.
वैशालीच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, वैशालीला आपल्या वाढदिवसाचे तपशील अतिशय व्यक्तिगत पध्दतीनेच ठेवायला आवडतात. तिला आपल्या वाढदिवसाची विशेष वाच्यता करायला आवडत नाही. तिच्या वाढदिवसाचा दिवस ती आपल्या कुटूंबासोबतच घालवते.