Marathi News
‘बबन’ ने साजरी केली सुपरहिट नॉनस्टाॅप ५० ची सक्सेसपार्टी


‘बबन’ हा सिनेमा २३ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. त्यादिवसांपासून आजतागायत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १३ कोटीची रग्गड कमाई केली आहे. तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील काही सिनेमागृहात आजही ‘बबन’ मोठ्या आवडीने पाहिला जात आहे. ख्वाडा फेम अभिनेता भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव या सिनेमातल्या प्रमुख कलाकारांच्या कामगिरीचेदेखील सर्वत्र विशेष कौतुक केले जात आहे. सामान्य कथा आणि सामान्य चेहऱ्यांना घेऊन मोठ्या पडद्यावर सादर झालेल्या या सिनेमाचे यश नक्कीच असामान्य आहे. त्यामुळे नाबाद ५० दिवस पूर्ण करणाऱ्या ‘बबन’ ने जर सुपरहिट १०० दिवसांवर कूच केली, तर काही वावगे ठरणार नाही !