बंगळूरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे जेतेपद ‘दी सायलेंस’ कडे

IMG_0443

बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकन मिळवल्यानंतर आता ‘दी सायलेंस’ ह्या चित्रपटाने बंगळूरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या जेतेपदावर नाव कोरले आहे. 28 जानेवारी, 2016 ते 5 फेब्रुवारी, 2016 दरम्यान हा चित्रपट महोत्त्सव रंगला होता. या महोत्सवात आलेल्या चित्रपटांमधून ‘दी सायलेंस’च्या वेगळेपणासाठी या चित्रपटाला जेतेपद देण्यात आले.

जर्मन, ब्राझील, सिनेब्राझीलीया, इफ्फी आणि दिल्ली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेतही ‘दी सायलेंस’ला नामांकने मिळाली होती. तर मामी फिल्म फेस्टिवलमध्ये 4 नोव्हेंबरला या चित्रपटाचं स्क्रिनींग करण्यात आलं. नेहमीचं काहीतरी नवीन देऊ पाहणाऱ्या गजेंद्र अहिरेंचा ‘दी सायलेंस’ अशाच एका वेगळया विषयावर भाष्य करतो. हाचं वेगळेपणा ‘दी सायलेंस’ चित्रपटाला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत वाह…! वाह..! मिळवून देत आहे.

याआधी ‘दी सायलेंस’ने जर्मनमध्ये होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये मान मिळवला आहे. या चित्रपटासाठी गजेंद्र अहिरेंना जर्मन स्टार ऑफ इंडिया 2015 च्या ‘डायरेक्टर्स व्हिजन’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

एस एम आर प्रोडक्शन्सचा ‘दी सायलेंस’ हा चित्रपट सत्यकथेवर आधारीत आहे. कोकणात राहणाऱ्या चिनीची व्यथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. आपल्या बाबांबरोबर राहणाऱ्या चिनीच्या आयुष्यातील एक काळा दिवस आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत करणाऱ्या त्या आठवणी दी सायलेंसमध्ये चित्रित करण्यात आल्या आहेत. दुष्कृत्य करण्यासाठी हपापलेले हात आणि त्यामुळे कोवळ्या जीवांची अकारण होणारी फरफट गजेंद्र अहिरेंचा ‘दी सायलेंस’ सांगून जातो.

समाजात वाढत चाललेल्या दुष्प्रवृत्तींवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात नागराज मंजुळे, कादंबरी कदम आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसतील. हिंदीत नाव मिळवल्यानंतर अंजली पाटील पहिल्यांदाचं दी सायलेंस चित्रपटातून मराठी सिनेमात येत आहे. त्याशिवाय हिंदीतला गाजलेला चेहरा रघुवीर यादव आपल्याला मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. तर ‘दी सायलेंस’ च्या निमित्ताने मुग्धा चाफेकर आणि वेदश्री महाजन हे नवीन चेहरे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.

अश्विनी सिद्वानी, अर्पण भुखनवाला आणि नवनीत हुल्लड मोरादाबादी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अश्विनी सिद्वानी यांनी चित्रपटाची कथाही लिहिली आहे. पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन अशा तिहेरी भूमिकेत गजेंद्र अहिरे आपल्याला दिसणार आहेत. छायाचित्रदिग्दर्शन कृष्णा सोरेन यांचं असून चित्रपटाचं संकलन मयुर हरदास यांनी केले आहे. या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे त्याचं संगीत…’दि सायलेसं’ च्या निमित्ताने इंडियन ओशन हा रॉक बँड मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतो आहे. असा हा दी सायलेंस लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

About justmarathi

Check Also

Samatar Marathi Web Series

“समांतर” पहिलीवहिली बहुभाषिक मराठी वेबसिरीज

Samatar Marathi Web Series: एकाचा भूतकाळ दुसऱ्याच भविष्य असेल तर काय घडू शकत? या आशयाला …

Leave a Reply