Marathi News

‘फुगे’मध्ये दिसणार स्वप्नील-सुबोधचा ‘याराणा’ 

film-still-1

प्रेमात सारे काही माफ असते असे म्हणतात, मग मैत्रीत का नाही? प्रेमात अपेक्षा आडव्या येतात पण मैत्री ही निस्वार्थ असते, त्यामुळेच ती प्रेमापेक्षा श्रेष्ठ ठरते. आपल्या अवतीभोवती असे अनेक मित्र-मैत्रिणी सापडतील कि ज्यांना आपली दोस्ती इतर नात्यांहून अधिक खास वाटत असते. मैत्रीच्या जगात रमणाऱ्या या दोस्तांची ही केमिस्ट्री त्यांच्या कुटुंबांकरीता कधीकधी डोकेदुखी बनून जाते. अशा या घनिष्ट मित्रांवर आधारित असलेला ‘फुगे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेम नव्हे तर प्रेमाची बेकस्टोरी सांगणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.

यांनी केली असून इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘फुगे’ या अतरंगी नावामुळेच या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे. खास करून सिनेमातील स्वप्नील आणि सुबोध मधला याराणा या सिनेमाला वेगळ्याच टप्प्यावर घेऊन जात आहे.

मुख्यत्वेकरून मराठी सिनेसृष्टीचा चार्म अभिनेता स्वप्नील जोशीचा सिनेमा म्हंटला तर त्यात लव्हस्टोरी ही आलीच! त्यामुळे ‘फुगे’ मध्ये देखील स्वप्नील रोमँटिक हिरोची भूमिका करताना दिसेल यात वाद नाही.  मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातील मध्यमवर्गीय आणि पुण्याच्या स्वाभिमानी नायकाची भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती. अशीच एका पुण्यातील मध्यमवर्गीय आदित्य अग्निहोत्री नामक तरुणाची भूमिका करताना तो या सिनेमात दिसेल. मग अशावेळी आतापर्यंत लोकमान्य, बालगंधर्व सारखे ऐतिहासिक आणि धीरगंभीर सिनेमे करणारा सुबोध भावे यात काय करतोय असा प्रश्न स्वाभाविक पडतो. ‘फुगे’ या सिनेमातील सुबोधचा लूक प्रेक्षकांसाठी मोठे सरप्राईज पेकेज ठरणार आहे. ‘फुगे’ सिनेमाद्वारे सुबोध आपल्या या चाकोरीबद्ध भूमिकेतून बाहेर पडलेला दिसणार असून यात तो ऋषिकेश देशमुख नावाच्या, आताच्या मनमौजी डेनिम घालणाऱ्या आणि स्वच्छंदी आयुष्य जगणाऱ्या युवकाच्या भूमिकेतून त्याच्या चाहत्यांसमोर येत आहे.

अशाप्रकारे, स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे नव्हे तर स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी या नवीन दोस्तांचा हा गमतीशीर सिनेमा प्रेमाची बेकस्टोरी सांगण्यास सज्ज झाला आहे. ‘प्रेम’ केवळ प्रेमीयुगुलांचे नसते तर ते दोन मित्रांचे देखील असू शकते असेच काहीसे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. स्वप्नील-सुबोधचा हा ‘याराणा’ येत्या २ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. प्रेमाच्या या हटके बेकस्टोरीची हि हटके गम्मत पाहण्यास प्रेक्षकही उत्सुक झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button