Marathi News

प्रेमाची बॅकस्टोरी सांगणाऱ्या ‘फुगे’ सिनेमाचे टीजर पोस्टर लॉंच

fugay-teaser

आपल्या सिनेमातून प्रेमाची नवी परिभाषा मांडणाऱ्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी लवकरच त्यांच्या आगामी ‘फुगे’ या मराठी सिनेमातून प्रेमाची हटके बॅकस्टोरी लोकांसमोर घेऊन येत आहेत. प्रेमाच्या या हटके बॅकस्टोरीत स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे हे मराठी चित्रपटसृष्टीतले तगडे स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत आहेत. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत अश्विन आंचन, अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार आणि अनुराधा जोशी यांची   निर्मिती असलेल्या या सिनेमाचे सोशल साईटवर नुकताच टीजर पोस्टर लॉंच करण्यात आला.  सिनेमाच्या ‘फुगे’ या हटके नावाला साजेशा अशा या टीजर पोस्टरला सोशल साईटवर तुफान प्रसिद्धी मिळत आहे. हे पोस्टर पाहताचक्षणी डोळ्यात भरते.

सुंदर समुद्र किनारा असलेल्या या पोस्टरवर रंगीबेरंगी फुगे पाहायला मिळत असून, हे फुगे पाहणाऱ्यांचे मन प्रसन्न करतात. शिवाय या टीजर पोस्टरमधील आणखीन एक गम्मत म्हणजे सिनेमातील प्रमुख कलाकारांच्या आडनावात स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी असा घोळ झालेला दिसून येत आहे. मुळात हा घोळ नसून स्वप्नील आणि सुबोधच्या आडनावांची ही अदलाबदल जाणूनबुजून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खुद्द स्वप्नील आणि सुबोधने देखील त्याला दुजोरा देत आपापल्या ट्विटर अकाउंटचे स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी असे नामकरण करून टाकले आहे. त्यामुळे ‘फुगे’ हा सिनेमा नेमका कशावर आधारित आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

रंगीबेरंगी फुग्यांनी भरलेले हे पोस्टर पाहताना ‘फुगे’ हा सिनेमा एका वेगळ्याच धाटणीचा असल्याचे समजून येते. मुळात मन प्रसन्न करण्यासाठी आणि मनोरंजनासाठी हाताळण्यास हलके असणारे फुगे लहान मुलापासून ते अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकांना लुभावतात. त्यामुळे हा सिनेमा ‘फुगे’ या नावाला समर्पक असे प्रेक्षकांचे मनोरंजन करेल ही खात्री आहे.

मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरमुळे ‘फुगे’ या सिनेमाला प्रदर्शनाआधीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारी एस.टी.व्ही.नेटवर्क या निर्मितीसंस्थेअंतर्गत प्रदर्शित होणारा हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. यापूर्वी देखील एस टीव्ही नेटवर्कने निर्मित केलेल्या विविध चित्रपटातून त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे, तसेच मराठी सिनेवर्तुळात वर्चस्व गाजवणारे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बऱ्हाण यांच्या जीसिम्स स्टुडियोजचा देखील यात मोठा वाटा आहे. संपूर्ण महाराष्ट्राला मनोरंजनाची खुमासदार मेजवानी देणारे जीसिम्स ‘फुगे’ या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर उभे ठाकत आहे. शिवाय स्वप्नील आणि सुबोधला प्रथमच एकत्र पाहण्याचा योगही या सिनेमाद्वारे जुळून आला असल्यामुळे हा सिनेमा लोकांसाठी दुहेरी मेजवानी ठरणार आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button