निर्माते मोहसिन अख्तर आणि उर्मिला मातोंडकरने लॉंच केला ‘माधुरी’चा ट्रेलर!
उर्मिला मातोंडकर प्रस्तुत, मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माधुरी’ या चित्रपटात ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. टीझर पोस्टरमधून ‘माधुरी’ चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती आणि हीच उत्सुकता लक्षात घेता आता सोनाली कुलकर्णी, शरद केळकर आणि संहिता जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘माधुरी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस हजर आहे.
ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की सोनाली कुलकर्णी एका तरुणीची भूमिका साकारत असून सध्या तरुण पिढीवर उद्भवणारे अनेक चांगले आणि वाईट प्रसंग आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरे जाऊन त्याचे कशाप्रकारे निरसन करू शकतो ह्याचे प्रदर्शन ट्रेलर मध्ये होत आहे. सोनालीसोबत शरद केळकर, संहिता जोशी, अक्षय केळकर आणि विराजस कुलकर्णी यांनी साकारलेल्या पात्रांची झलक देखील ट्रेलरमध्ये पाहू शकतो.
या चित्रपटाच्या मार्फत देण्यात येणाऱ्या संदेशाविषयी बोलताना मुंबापुरी प्रॉडक्शनचे मोहसिन अख्तर यांनी म्हटले की, “आयुष्यात परिस्थिती वाईट असली की आपण दुःखी होतो पण याचा अर्थ असा नाही की आपण हसणं विसरतो. आयुष्यात असे काही phasases येतात पण आपण आयुष्य मात्र जगत राहतो. यावरच आधारीत एक संदेश आम्ही तरुणांना आणि पालकांना देऊ इच्छितो.”
सोनाली कुलकर्णी आणि शरद केळकर यांच्या कामाविषयी मोहसिन यांना नेहमीच विश्वास होता. तसेच नवोदित अभिनेत्री संहिता जोशीची निवड करून तिच्या अभिनयावर विश्वास दाखवून या चित्रपटात संधी दिली. अक्षय केळकर, विराजस, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी, संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते, गायक
गायिका या सर्वांनी ‘माधुरी’ साठी मेहनत घेऊन आपापल्या जबाबदाऱ्या योग्यरीत्या पेलल्या, असेही निर्माते मोहसिन यांनी सांगितले.
मुंबापुरी प्रॉडक्शन आणि मोहसिन अख्तर यांचा पहिला मराठी चित्रपट, सोनाली कुलकर्णीचा हटके लूक, संपूर्ण स्टारकास्टचा तगडा अभिनय या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असा ‘माधुरी’ चित्रपट ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.