Marathi News

नवीन वर्षात सर्वजण म्हणणार ‘लव्ह यु जिंदगी’

 

प्रेम जरी आयुष्यावर असलं तरी त्याची परिभाषा ही वयोगटानुसार वेगळी असते आणि अनिरुध्द दातेची तारुण्य पुन्हा एकदा जगण्याची इच्छा हे सर्व आपण ‘लव्ह यु जिंदगी’ यामराठी चित्रपटाच्या टीझरमध्ये पाहिले आहे. टीझरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद देखील दिला होता. पण प्रेक्षकांच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम हटके आणि इंटरेस्टिंगकरण्यासाठी हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर यांची प्रमुख भूमिका आहे आणि त्यांच्या सोबतीला अभिनेत्री कविता लाड आणि प्रार्थना बेहरे देखील महत्त्वाची भूमिकासाकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. आणि नुकतेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्येत्यांचा नवा लूक आपण पाहू शकतो. तसेच कविता लाड आणि सचिन पिळगांवकर यांची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच अनुभवयाला मिळणार आहे. इतकंच नव्हे तर कविता लाडआणि प्रार्थना बेहरे देखील पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

कविता लाड यांनी प्रत्येक मनोरंजनाच्या माध्यमातून त्यांच्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांनी देखील त्यांच्या प्रत्येक भूमिकेला मनापासून प्रतिसाददिला आहे. पण  नवीन वर्षात ‘लव्ह यु जिंदगी’मुळे कविता लाड यांची नवी भूमिका आणि तिघांचीही पहिल्यांदाच जुळून आलेली ऑन-स्क्रिन केमिस्ट्री पाहणं नक्कीच रंजकठरणार आहे.

एस. पी. प्रोडक्शन्स  प्रस्तुत, सचिन बामगुडे निर्मित ‘लव्ह यु जिंदगी’ या कौटुंबिक मनोरंजन करणा-या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज सावंत यांनी केले असून हा चित्रपट ११जानेवारी २०१९ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button