Marathi News

दोस्तीगिरीचे टायटल ट्रॅक ‘तुझी माझी यारी दोस्ती’ झाले रिलीज !

dostigiri

 

मैत्रीच्या निरागस, निखळ नात्यावर असलेल्या दोस्तीगिरी सिनेमाचे ‘तुझी माझी यारी दोस्ती’ हे गाणे रिलीज झाले आहे. जागतिक मैत्री दिनाच्या सूमारास रिलीज झालेल्या ह्या गाण्यात मैत्रीतला गोडवा, खोडसाळपणा दिसून येतो आहे.

‘तुझी माझी यारी दोस्ती’ चे संगीत दिग्दर्शन रोहन-रोहन ह्यांनी केले आहे. आणि त्यांनीच गायिका प्राजक्ता शुक्रेसोबत हे गाणे गायले आहे. ह्याविषयी रोहन-रोहन म्हणतात,“आम्हा दोघांची मैत्री आमच्या संगीताविषयीच्या आवडीमूळे झाली. त्यानंतर आम्ही एकत्र काम करू लागलो. त्यामूळे मैत्रीचं नातं आम्हा दोघांसाठी खूप स्पेशल आहे. आणि आमच्या भावनाच ह्या गाण्यातून व्यक्त झाल्यात.”

अभिनेता संकेत पाठक सांगतो, “हे गाणं अक्षय, विजय, पुजा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. कारण ह्या गाण्यानेच चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. ह्या गाण्याच्या शूटिंग दरम्यान एकमेकांना अनोळखी असलेल्या आम्हा एक्टर्सची एकमेकांशी घट्ट मैत्री झाली. ह्या गाण्याच्या शुटिंगच्यावेळी आम्ही केलेली धमाल तर अविस्मरणीय आहे.”

संतोष पानकर निर्मित, विजय शिंदे दिग्दर्शित दोस्तीगिरी सिनेमाचे लेखन मनोज वाडकर ह्यांनी केले आहे. रोहन-रोहन ह्यांच्या संगीताने सजलेल्या ह्या सिनेमात संकेत पाठक, पुजा मळेकर, विजय गिते, पुजा जयस्वाल आणि अक्षय वाघमारे, हे मुख्य भूमिकेत दिसतील. ‘अरिहंत मुव्हिज क्रिएशन्स’ प्रस्तूत ‘मोरया मुव्हिज क्रिएशन्स’ निर्मित ‘दोस्तीगिरी’ 24 ऑगस्ट 2018ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button