दीपिका- रणवीर पेक्षा अनुष्का-विराटचा लग्नसोहळा सर्वाधिक लोकप्रिय
विरूश्काच्या लग्नानंतर एक वर्षाच्या आतच दीपवीरचंही लग्न झालं. आणि मग अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचं लग्न जास्त लोकप्रिय की दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचे लग्न जास्त लोकप्रिय ह्यावर मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. पण आता स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या समोर आलेल्या आकडेवारीनूसार, असं समोर आलंय की, दीपिका-रणवीरच्या लग्नापेक्षा अनुष्का-विराटचं लग्न सर्वाधिक लोकप्रिय आणि सोशल मीडियावरून वायरल झालं.
गेल्या वर्षी अनुष्का-विराटचे 11 डिसेंबरला लग्न झाले. 08 ते 14 डिसेंबर 2017 मध्ये आलेल्या आकडेवारीनूसार, ह्या दरम्यान ट्विटर, वर्तमानपत्रे, वायरल न्यूज़ आणि डिजिटल न्यूज रँकिंगमध्ये त्यांनी लोकप्रियतेत सर्वाधिक म्हणजेच 100 गुण मिळवले होते आणि ते नंबर वन स्थानी होते. फेसबुकवर मात्र 61 गुणांसह ही जोडी चौथ्या स्थानी होती.
नुकतेच 14 आणि 15 नोव्हेंबरला दीपिका आणि रणवीरचे लग्न झाले. त्या आठवड्यात ट्विटर, वायरल न्यूज़ आणि डिजिटल न्यूजवर 100 अंकांसह ही जोडी पहल्या स्थानी होती. तसेच फेसबुक रँकिंगमध्ये 88 गुणांसह ही जोडी दूस-या स्थानावर होती आणि न्यूजपेपर रँकिंगमध्ये 45 गुणांसह तिस-य स्थानावर होती.
दोन्ही लग्नांची आकडेवारी व्यावस्थित पाहिल्यावर लक्षात येते की, विरूश्का पहिल्या स्थानावर तर दीपवीर लोकप्रियतेत दूस-या स्थानावर आहेत. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “विराटची लोकप्रियता वैश्विक आहे. ह्यामूळेच त्याच्या लग्नाची बातमी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र, वेबसाइट्स, न्यूजचॅनल्स, मनोरंजन और खेळविषयक पोर्टल्सवर झळकली. म्हणूनच दीपिका- रणवीरच्या लग्नाच्या तुलनेत विरूश्काचे लग्न जास्त लोकप्रिय ठरले.”
अश्वनी पूढे सांगतात, “फेसबुकवर दीपिका आणि रणवीरची फॅन फॉलोविंग जास्त असल्याने विराट आणि अनुष्कापेक्षा दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची चर्चा फेसबुकवर अधिक झाली. आता लवकरच प्रियंका-नीकचे लग्न होणार आहे. हे मचअवेटेड लग्न गेमचेंजर ठरू शकते.“
अश्वनी कौल सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”