तेलगू चित्रपटांचे महानायक श्री पवन कल्याण ऐतिहासिक दिल्ली दौऱ्यासाठी तयार!
तेलगू चित्रपटांचे महानायक श्री पवन कल्याण यांनी तेलगू चित्रपट सृष्टीमध्ये अभिनया बरोबरच अनेक स्तरांवर काम केले आहे. त्यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केले असून ते स्वतः निर्माते देखील आहेत. चित्रपटान बरोबरच त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द देखील सुरु केली असून जन सेना पार्टी नावाचा पक्ष देखील स्थापन केला आहे आणि ते आता दिल्ली दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत.
श्री पवन कल्याण आपल्या चाहत्यांसाठी येत्या गुरुवारी देशाची राजधानी दिलीत दाखल होणार आहेत.400;”>गुरुवारी दिनांक २० फेब्रुवारी रोजे सकाळीच श्री पावन कल्याण हे दिल्लीत असणाऱ्या केंद्रीय सैनिक बोर्डाला भेट देणार असून एक करोड रुपयांचा निधी देणार आहेत.
गुरुवारी दुपार नंतर, श्री पवन कल्याण हे दिल्लीच्या भारतीय छात्र संसदेला हि भेट देणार असून तिथे ते मार्गदर्शन देखील करणार आहेत. विज्ञान भवन येथे हा कार्यक्रम होणार असून या तेलगूच्या महानायकवर एक शॉर्ट फिल्म देखील दाखवली जाणार असून त्या नंतर श्री पवन कल्याण हेय तरुण आणि भाव नेत्यांचं मार्गदर्शन देखील करणार आहेत. भारतीय छात्र संसदेला देशातील सर्वात मोठा शैक्षणिक वर्ग मानला जाते आणि तसेच अनेक भावी राजकीय नेत्यांचे ते एक छोटेसे जगच आहे.
भाजपच्या खासदार सम्रीती इराणी व काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया देखील या कार्यक्रमाला भेट देणार आहेत.