तीच धम्माल मस्ती घेऊन पुन्हा येतोय ‘बॉईज’

JmAMP

BOYZ 2

 

‘आम्ही लग्नाळू’ म्हणत सर्व किशोरवयीन मुलांना खूळ लावणारा विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ हा सिनेमा पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याच धम्माल मस्तीचा धुमाकूळ घेऊन येणारा हा ‘बॉईज २’, येत्या ५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करण्यास येत आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँच करण्यात आला. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत ‘बॉईज २’ चे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले आहे.

किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या सुपरहिट ‘बॉईज’ च्या या दुसऱ्या पर्वात कोणकोणते कलाकार असणार आहेत, हे अद्याप समजू शकले नसले तरी, सिनेमाच्या टीझर पोस्टरवरून हा सिनेमादेखील कम्प्लीट युथ इंटरटेनिंग असल्याचे लक्षात येते इतकेच नव्हे तर, ऋषिकेश कोळी यांनी या सिनेमाचे संवाद आणि पटकथा लिहिले असल्यामुळे, यापूर्वीच्या ‘बॉईज’चित्रपटातल्या शाब्दिक कोट्यांची मज्जा ‘बॉईज २’ या सिनेमांतदेखील प्रेक्षकांना पुरेपूर लुटता येणार आहे.

लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी ‘बॉईज २’ या एनरजेटिक सिनेमाच्या निर्मात्याची भूमिका बजावली आहे. तीन मित्रांची रंजक दुनिया दाखवणाऱ्या, या सुपरहिट सिनेमाच्या दुसऱ्या भागात नेमके काय पाहायला मिळणार? याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली असून, मोठ्या पडद्यावरील ‘बॉईज’ च्या या पुनरागमनला सिनेचाहते भरघोस प्रतिसाद देतील, अशी आशादेखील व्यक्त होत आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे ‘बॉईज २’ चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखिल केले जाणार आहे.

About justmarathi

Check Also

Zoljhal

“झोलझाल” चे जय वीरू

JmAMP शोलेमधली जय-वीरूची मैत्री लवकरच मराठी पडद्यावर पहायला मिळणार आहे. अमोल कांगणे आणि ऋतुराज फडके …

Leave a Reply