Marathi News

ढोल ताशे आणि टाळ्यांच्या कडकडाटात गरजला ‘ठाकरे’चा ट्रेलर लाँच!

 

२६ डिसेंबर २०१८, मुंबई येथील कार्निवल आयमॅक्स वडाळा थेटरने उत्सवी रंग रूप धारण केले होते. तुतारी आणि नाशिक ढोलचा गजर भगव्या रंगात विलीन झाला होता. उत्सवी भगवे झेंडे सुवर्ण संगीतावर झळकत असून हळुवार वाहणारी वाऱ्याची झुळूक त्याला समर्थन देत होती. एका भव्य अशा स्तंभावर विराजमान झालेलाव२० फूट उंचीच्या उत्साहवर्धक कट आऊटद्वारे बाळासाहेब ठाकरे खुश दिसून येत होते. ‘ठाकरे’ चित्रपटाच्या ट्रेलरने केवळ तेथील सुखद वातावरणाला न्याय दिला नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तित्वाला देखील सलाम केला.
 
बाळासाहेब ठाकरे मेमोरॅबिलिया कॉर्नर, मराठा चिन्ह आणि सिंहासनावर बसलेल्या शिवाजी महाराजांचा भव्य पुतळ्याला जणू काही तमाम झेंडे समाली देत होते. तर दुसरीकडे, थिएटरमध्ये सुरू झालेल्या ठाकरे ट्रेलर लाँचला मिळणारा उत्साहवर्धक प्रतिसाद आणि टाळ्यांच्या कडकडाटासमोर नाशिक ढोल देखील फिका पडत होता.
 
संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित ‘ठाकरे’ हा २०१९ मधील सर्वांत प्रलंबित चित्रपटांपैकी एक असून जगभर त्याच्या प्रदर्शनाची वाट पाहिली जात आहे.
 
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे चित्रपटाचा ट्रेलर पाहून शहारले. ते सांगतात की, “मी 52 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांचे आयुष्य जवळून पाहिले आहे आणि ते एका चित्रपटात समाविष्ट करणे सोपे नाही. माझा संजय राऊत आणि समर्पित टीमवर पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की आम्ही जागतिक पातळीवर या चित्रपटाची लाट तयार करू अशाप्रकारे बाळासाहेबांचे व्यक्तित्व आहे. त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारचा समझोता न करता कणखरपणे व निर्भयपणे आपले विचार आणि मत मांडले.”
 
सुप्रसिद्ध पत्रकार आणि संसद सदस्य संजय राऊत यांनी  ‘सामना’ वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक या नात्याने त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास जवळून पाहिला आहे. बाळासाहेब ठाकरेरुपी गर्जणा-या सिंहाचे अनुभव सांगताना संजय राऊत म्हणतात की, “बाळासाहेबांनी सामान्य माणसाला सुपरमॅन बनवले. बाळासाहेब म्हणजे जणू काही परिस होय त्यांनी स्पर्शीलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य बदलून जाते. भारतातील प्रत्येक सामान्य युवक त्यांच्यातील असामान्य शक्ती ओळखू शकतो. इतकी ताकद या चित्रपटात आहे.” 
राऊत म्हणतात,“आपल्या लोकांसाठी, आपल्या राज्यासाठी आणि आपल्या भूमीपुत्रांसाठी बाळासाहेबांनी दिलेला लढा हा महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि नेल्सन मंडेला यांनी दिलेल्या लढ्यांपेक्षा किंचितही कमी नाही. बाळासाहेबांचे जीवन इतकं नाट्यपुर्ण आहे की त्यांनी न्याय मिळवण्यासाठी समाजाला व येणा-या पिढीला प्रेरणा दिली. आपल्या कुंचल्याच्या फटका-याच्या माध्यमातून त्यांनी शहराचा, राज्याचा, आणि राष्ट्राचा इतिहास पुन्हा लिहीला. ज्या व्यक्तीमत्वाची कारकीर्दच एवढी मोठी आहे, त्यांच्याकरिता, हा चित्रपट एक खरी आदरांजली ठरेल.” 
 
अजित अंधारे, सीओओ, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स  म्हणतात की,”निर्मिती क्षेत्रात ‘ठाकरे’ हा आमचा ७५वा तर मराठी चित्रपटांतील १०वा चित्रपट आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे यांसारख्या विस्मयकारक आणि प्रेरणादायी व्यक्तित्वाचा जीवनपट म्हणून आमच्यासाठी तो खूप खास आहे. या चित्रपटाद्वारे आम्ही प्रथमच हिंदी आणि मराठी आशा द्विभाषिक चित्रपटाचे प्रदर्शन एकाच दिवशी करीत आहोत. या चित्रपटाशी अशा एका नेत्याचे व व्यक्तित्वाचे जीवन जोडले गेलेले आहे ज्यांचे हजारो-करोडो लोकांशी अद्वितीय असे बंध जोडले गेलेले आहेत. बाळासाहेबांचा जीवनपट ही एक खूप मोठी जबाबदारी आहे कारण त्यांनी आखलेले मानदंड खूप उच्च आहेत. हा आमच्यासाठी एक प्रकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे आणि आम्ही या चित्रपटाचा भाग म्हणून भाग्यवान आहोत.” 
 
कार्निव्हल ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. श्रीकांत भासी म्हणतात,”आम्ही कार्निवल मोशन पिक्चर्स चित्रपटाच्या आशयावर विश्वास ठेवतो. सामान्य माणूस कसा बदल आणू शकतो याचे उदाहरण म्हणजे बाळासाहेब ठाकरे. नवाजुद्दीन सिद्दीकी सारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ‘ठाकरे’ चित्रपटाला लाभल्यामुळे त्यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. त्याचप्रमाणे माननीय संजय राऊत आणि वायकॉम१८ मोशन पिक्चर्स यांच्यासमवेत ‘ठाकरे’ या २०१९ मधील सर्वांत प्रलंबित चित्रपटाची निर्मिती करीत असल्याचा देखील खूप आनंद होत आहे.”
 
‘ठाकरे’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तर अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसून येणार असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तांत्रिक विभागाची टीम ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने काम करताना दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केलेले असून येत्या २५ जानेवारी २०१९ ला हा चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button