Marathi News

‘ठाकरे’ चित्रपटात गरजणार बाळासाहेबांचे संवाद!

Nawazuddin Siddiqui

जेव्हा हिंदुहृदयसम्राट बोलू लागतात तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध होतात. त्यांचे शब्द, त्यांचे कार्य, प्रत्येक वेळी पुन्हा नवीन इतिहास लिहितात. ठाकरे हे एक असे नेते होते ज्यांनी सामान्य माणसाला सामर्थ्य दिले, त्यांना त्यांच्या हक्कांसाठी उभे राहण्यास आणि योग्य नसलेल्या कोणत्याही गोष्टीविरुद्ध लढण्यासाठी शिकवले.
२५ जानेवारीला जगभरात प्रदर्शित होणाऱ्या ‘ठाकरे’ चित्रपटातील बहुतांशी संवाद हे बाळासाहेबांनी प्रत्यक्षात त्यांच्या वास्तविक आयुष्यत उच्चारलेले संवाद आहेत, त्यामुळे अप्रत्यक्षपणे बाळासाहेब या चित्रपटाचे संवाद लेखक आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या संदर्भात एमपी – राज्यसभा, प्रसिद्ध पत्रकार आणि ‘ठाकरे चित्रपट लेखक-निर्माते, संजय राऊत म्हणतात की, “ठाकरे हा जीवनपट वास्तविक आहे आणि त्यात कोणतेही तथ्य संपादित केलेले नाही. चित्रपटातील संवाद हे बाळासाहेबांच्या विविध भाषणांतून घेण्यात आलेले त्यांनी त्यांच्या वास्तविक आयुष्यात उच्चारलेले आहेत. बाळासाहेबांच्या शब्दांची जादूचं अशी होती की, आम्हाला चित्रपटासाठी संवाद लेखकांची गरज भासली नाही. चित्रपटात त्यांचेच शब्द तितक्याच प्रखरपणे वापरण्यात आले आहेत. यामुळे अरविंद जगताप आणि मनोज यादव यांचे काम सोपे झाले. “
संजय राऊत प्रस्तुत, राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि कार्निवल मोशन पिक्चर्स निर्मित ‘ठाकरे’ येत्या २५ जानेवारी ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार  आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तांत्रिक विभागाच्या टीमने ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने काम केलेले आहे. दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button