Marathi News
जॉन्सन अँड जॉन्सन च्या नव्या जाहीरातीत झळकला राघव स्वप्नील जोशी

गेली कित्येक वर्ष आपण ऐकत असलेली ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण राघव स्वप्नील जोशीसाठी अगदी तंतोतंत लागू झाली आहे. न्यू जॉन्सन च्या नुकत्याच लाँच झालेल्या जाहीरातीतून राघव प्रेक्षकांसमोर आला आहे.
तब्बल २५ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या स्वप्नीलने ही नवव्या वर्षी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं….मात्र राघवने आपल्या वडिलांच्या एक पाऊल पुढे जात अवघ्या नवव्या महिन्यात जाहीरातविश्वात धमाकेदार एंट्री मारली आहे.
७ डिसेंबर २०१७ ला स्वप्नीलच्या घरी जन्माला आलेला हा बाळकृष्ण नवव्या महिन्यातच अभिनयाचं बाळकडू प्यायला आहे.
Leave a Reply
You must be logged in to post a comment.