जे होते मलामधून प्रेक्षकांच्या मनातल्या भावना पडद्यावर युथ च्या गाण्यांची भन्नाट जादू

सगळ्यांच्याच आयुष्यात येणारे एक वळण म्हणजे प्रेमात पडण्याचा काळ…सरळ मार्गाने जाताना अचानक अशी व्यक्ती भेटते जिला पाहून मनात काहूर माजतं. नकळत आपण त्या व्यक्तीला पसंत करायला लागतो आणि कधी तिच्या प्रेमात पडतो…हे कळतसुध्दा नाही. हीच ती व्यक्ती याची जाणीव झाल्यापासून त्या व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना सांगण्यापर्यंतचा काळ…म्हणजे एक वेगळंच जग…हेच जग पडद्यावर साकारले आहे युथ चित्रपटाच्या “जे होते मला…” या गाण्यातून…
अरमान मलिकच्या आवाजातील या गाण्याचा ऑडियो रिलीज झाला आणि “जे होते मला, होते का तुला” विचारावेसे वाटणाऱ्या प्रियकराला एक नवे गाणे मिळाले…अरमानच्या आवाजाची जादू सगळ्याचं ह्रदयांवर झाली. तरूणाईच्या ह्रदयाचा ठोका चुकवणाऱ्या या गाण्याचा विडियोही तितकाच भन्नाट आहे. अभिनेता अक्षय वाघमारे आणि अभिनेत्री नेहा महाजन यांच्यावर चित्रीत हे गाणे…ज्यात नेहाचा अल्लडपणा अक्षयला भावतो आणि यातूनच अक्षयच्या मनात हे प्रेमबंध फुलायला लागतात. या दोन जीवांची घालमेल या गाण्यात उत्कृष्टरीत्या चित्रीत करण्यात आली आहे.
विक्टरी फिल्म्स प्रस्तुत आणि सुंदर सेतुरामन निर्मित युथ या चित्रपटात दुष्काळग्रस्त परिस्थितीचे भीषण चित्रण करण्यात आले आहे. हा अनोखा विषय हाताळताना दिग्दर्शक राकेश कुडाळकर यांनी प्रेमाची हलकी-फुलकी छटा या चित्रपटात रेखाटली आहे. जे होते मला या गाण्याच्या निमित्ताने अजून एक रोमँटिक ट्रॅक मराठीत सामिल झाला आहे.
विक्टरी फिल्म्स ची प्रस्तुती असणाऱ्या या चित्रपटात नेहा महाजन आणि अक्षय वाघमारेसह अक्षय म्हात्रे, मीरा जोशी, शशांक जाधव, केतकी नारायण असे युवा कलाकार आहेत. त्याशिवाय विक्रम गोखले आणि सतिश पुळेकर हे दिग्गजही विशाल चव्हाण आणि युग यांनी या चित्रपटात दिसणार आहेत. तर असा हा बदल घडवण्याची ताकद असणारा युथ हा सिनेमा येत्या 3 जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.




Leave a Reply
You must be logged in to post a comment.