Home > Marathi News > जुळता जुळता जुळतंय की मध्ये बस्ता बांधणीची उत्सुकता

जुळता जुळता जुळतंय की मध्ये बस्ता बांधणीची उत्सुकता

 

लग्न… दोन जीवांबरोबरच दोन कुटुंबांचं मिलन… या सोहळ्या दरम्यान होणाऱ्या छोट्या-छोट्या गोड गोष्टींनी हा सोहळा परिपूर्ण होतो. पूर्वी लग्नाची तारीख ठरली की बस्ता बांधणीची तयारी सुरू केली जायची. इथे वधू-वरांच्या कपड्यांपासून मानपानाच्या साड्यांचा ओढा वधूपित्याला ओढावा लागायचा. मात्र गेल्या काही वर्षात या प्रथेत बदल झाला आहे. लग्नसोहळ्याची मजा लुटण्याच्या हेतूने दोन्ही कुटूंब एकत्र येतात आणि लग्नाआधीच्या खरेदीचा आनंद लुटतात. अरेंज असो वा लव्ह, लग्न करून एक होणाऱ्या वधू-वरांना एकमेकांना भेटण्याची ही एक नामी संधी… त्यात दोन कुटूंब एकत्र येऊन नवरा-नवरीला चिडवण्यात येणारा आनंद काही औरच… तेव्हा या प्रथेला सहसा कुणी नाही म्हणताना दिसत नाही.

‘जुळता जुळता जुळतंय की’ मध्ये ही या आनंदाखातर विजय-अपूर्वाच्या लग्नाचा बस्ता बांधला जाणार आहे. रंकाळ्यावर विजयने अपूर्वाला प्रपोज केल्यानंतर मिळालेला होकार आता पुढच्या टप्प्यात पोहोचला आहे. प्रत्येकाची मनं सांभाळतं, बऱ्याच अडचणींचा सामना करत अखेर एकमेकांच्या गळ्यात माळ घालण्याचा निर्णय झाला आहे. लग्नाच्या दिशेने पहिलं पाऊलं लवकरच पडणार आहे आणि ते म्हणजे बस्ता बांधणीचं… विजय-अपूर्वा च्या बस्ता बांधणीला मित्रमंडळी आणि विजयचे नातेवाईक हजर असणार आहेत. आता विजय-अपूर्वा च्या बस्त्या दरम्यान होणारी धमाल तुम्ही ही अनुभवा आणि यांच्या लग्नसोहळ्यात तुमचे आशिर्वद द्यायला हजर रहा… फक्त सोनी मराठीवर

About justmarathi

Check Also

मन फकीरा

मृण्मयी प्रतिभा देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मन फकीरा’चा म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात झाला संपन्न

‘मन फकीरा’ हा रोमँटिक ड्रामा प्रख्यात मराठी अभिनेत्री मृण्मयी प्रतिभा देशपांडे हिने लिहिला असून तीच …

Leave a Reply