Marathi News

जजमेंट सिनेमाच्या भूमिकेसाठी प्रतिक देशमुखने कमी केले वजन

शुभ लग्न सावधान’ सिनेमामधून एनआरआय रोहनच्या भूमिकेत दिसलेला चॉकलेट हिरो प्रतिक देशमुख आता आपल्या आगामी सिनेमात वेगळ्याच लूकमधून दिसणार आहे. आगामी जजमेंट सिनेमात तो यदुनाथ साटम ह्या नैराश्यग्रस्त तरूणाच्या भूमिकेत दिसेल.

आपली पहिली फिल्म शुभलग्न सावधान करतानाच प्रतिक देशमुखला जजमेंट फिल्मची ऑफर मिळाली. ह्याविषयी प्रतिक देशमुख सांगतो, रोहन आणि यदुनाथ दोघेही अमेरिकेतून शिक्षण घेऊन भारतात परतलेले तरूण आहेत. एवढंच त्यांच्यातलं साम्य. बाकी कौटुंबिक, मानसिक, आर्थिक पातळीवर दोन्हीही भूमिका खूप वेगळ्या धाटणीच्या आहेत. शुभलग्न मधला रोहन खूप फंकी होता. यो’ टाइपमधला होता. रोहन खूप एनर्जेटिक, बबली आणि हॅपी गो लकी मुलगा होता. शुभलग्नचा रोहन काहीसा बहिर्मुख तर जजमेंटमधला यदुनाथ अतिशय अंतर्मुख मुलगा आहे. 

अभिनेता प्रतिक देशमुख आपल्या भूमिकेच्या तयारीविषयी सांगतो, शुभलग्नचा रोहन सुखवस्तू मुलगा होता. पण यदुनाथची मानसिक अवस्था पाहता त्याला बारीक असणे गरजेचे होते. त्यामूळे शुभलग्न संपल्यावर लगेच मला वजन कमी करावे लागले. केसही आता मोठे आणि फंकी चालणार नव्हते. त्यामूळे व्यवस्थित भांग पाडणारा, क्लीन शेव असलेला यदुनाथ मी उभा केला.

प्रतिक देशमुख पूढे सांगतो,  सर्वसाधारणपणे आपल्या करीयरच्या सुरूवातीला नवोदित अभिनेत्यांना कॉलेज गोइंग तरूणांच्या भूमिका मिळतात. मात्र मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, शुभलग्नचा रोहन पाहून मला जजमेंटच्या फिल्ममेकर्सनी यदुनाथची भूमिका ऑफर केली.”      

Related Articles

Leave a Reply

Back to top button