Marathi News

गायक प्रवीण कुवर यांचे नवे धमाकेदार गाणे ‘तू माझी ब्युटीक्वीन’

 

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गायक प्रवीण कुवर आणखी एक नवं- कोरं गाणं घेऊन आपल्या भेटीला येत आहेत. सृष्टी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या गाण्याची निर्मिती केली आहे. ‘तू माझी ब्युटीक्वीन’ च्या रेकॉर्डींगला नूकतीच पुण्यातील व्ही.एस.एच स्टुडिओ येथे उत्साहात सुरुवात झाली.
झी मराठी वरील लोकप्रिय अशा ‘लागिर झालं जी’ या मालिकेचं टायटल सॉंग तसेच ‘ये रे ये रे पैसा’ या चित्रपटाचं टायटल सॉंग आणि ‘लव्ह लफडे’ या सिनेमातील ‘ताईच्या लग्नाला’ यांसारखी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे गायक प्रवीण कुवर आणखी एक धमाकेदार गाणं घेऊन येत आहेत. ‘तू माझी ब्यूटीक्वीन’ हे नवं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, आपल्या सुरेल आवाजाने प्रवीण कुवर यांनी आपला स्वतःचा असा एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गाण्याला रसिक प्रेक्षक अक्षरशः भरभरून प्रतिसाद देत असतात. या गाण्यातून अभिनेता किशोर बोरकर झळकणार आहे.
‘तू माझी ब्युटीक्वीन’ हे नॉन फिल्मी गाणं सर्वांना थिरकायला भाग पाडेल यात जराही शंका नाही.या गाण्यामधून नवीन आणि आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळणार आहे. हे गाणं म्हणजे रसिकांसाठी सरप्राइज असेल.या गाण्याचे गीतकार राहुल सूर्यवंशी असून विनय देशपांडे यांनी गाणं संगीतबद्ध केलं आहे. सृष्टी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेने या गाण्याची निर्मिती केली आहे. तसेच नृत्य दिग्दर्शन दिपक कुमार हे करणार आहेत. ह्या गाण्याचे निर्माता काशिनाथ कुढले असून दिग्दर्शनाची बाजू किरण शशिकांत जाधव हे संभाळणार आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button