गानकोकिळा लता मंगेशकर सादर करीत आहे प्रतिभावान कलाकार ‘रीवा राठोड’!
हृदयनाथ मंगेशकर, अमृता फडणवीस, जुही चावला, हरिहरन, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी रीवाच्या संगीत मैफिलीत आणि सिंगल लॉन्चला उपस्थिती दर्शविली.
गानसम्रादनी लता मंगेशकर, शास्त्रीय संगीत जोडी रूप कुमार राठोड आणि सुनाली राठोड यांची कन्या रीवा हीला सादर सादर करत म्हणतात की, “आज मी तुम्हाला एक अतिशय प्रतिभावान कलाकार सादर करीत आहे. तिचे नाव रीवा राठोड आहे. ती अतिशय सुंदर पियानो वाजवते, अनेक भाषांमध्ये गाते, तसेच ती संगीत देखील तयार करते. तिच्याकडे संगीत तयार करण्यासाठी आवश्यक सर्व योग्य प्रतिभा आहेत. मी आशा करतो की आपणास त्या सर्व आवडतील आणि तिच्या उत्साहाची देखील प्रशंसा होईल. रीवा, मी तुला आशीर्वाद देते आणि मला आशा आहे की, तू यशस्वी होशील.”
ख्यातनाम गीतकार गुलजार यांच्या लेखणीतून अवतरलेलं ‘मौला’ या पहिल्या-वहिल्या एकल गाण्यानंतर रीवा आता पुन्हा एक नवीन म्युजिक व्हिडीओ व सिंगल घेऊन येण्यास सज्ज झालेली आहे. ‘सांवल’ हे रीवाच्या म्युजिक व्हिडीओचे नाव असून, सेरैकी लोकगीत परंपरेच्या गाण्याला सुंदर अशा स्पॅनिश शब्दांची सांगड घालून ते रचण्यात आलेले आहे. प्रसिद्ध तबला वादक उस्ताद जाकिर हुसेन आणि मायकेल मेननार्ट यांनी या गाण्याची निर्मिती केलेली आहे. पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर, महाराष्ट्राच्या ‘फर्स्ट लेडी’ अमृता फडणवीस यांच्या हस्ते या खास संगीत संध्याकाळी रीवाचा ‘सांवल’ म्युजिक व्हिडीओ लाँच करण्यात आलेला असून जुही चावला, उषा मंगेशकर, हरिहरन, सुरेश वाडकर, जतिन पंडित, श्रावण राठोड यांच्या उपस्थितीत सिंगल लॉन्च केले गेले. इस्माइल दरबार, आदिनाथ मंगेशकर, मास्टर शेफ संजीव कपूर आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहोळा पार पडला.
रीवा राठोड, संगीतकार रूप कुमार राठोड आणि सुनाली राठोड यांची ती कन्या असून ध्रुपद चे उस्ताद स्वर्गीय पंडित चतुरभुज राठोड हे तिचे आजोबा होते. गायक विनोद राठोड आणि नदीम-श्रावण फेम श्रवण तिचे काका लागतात. अशा संगीतमय वातावर्णव त वाढलेल्या रीवाच्या नसानसांत संगीताचा संचार आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही.
रीवाचे गुरु पंडित हृदयनाथ मंगेशकर सांगतात की, “मी सुनाली ला शिकवले आहे आणि रूप ला ऐकले आहे. रीवाचे संगीत म्हणजे ह्या दोघांचाही अद्भुत संगम आहे. तिच्या गाण्यात एक प्रकारचे औचित्य व देवत्त्व आहे. मला तिचा अभिमान वाटतो.
लता मंगेशकर प्रस्तुत नुकत्याच पार पडलेल्या एका मैफिलीत रीवाला आपले संगीत सादर करायची संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करत, पियानो विशेष सादरीकरण, ठुमरी, टप्पा, मराठी भाव गीत, कर्नाटिक, जुन्या चित्रपटांतील क्लासिक, इंग्रजी पॉप, पंजाबी संगीत यासह इतर अनेक संगीत प्रकार तिने सादर केले. स्वतःतील अष्टपैलूत्व जपत पियानोवादक-गायक-संगीतकार रिवा ने स्वत: च्या गाण्यांनी श्रोत्यांच्या मनावर आपली छाप सोडली.
अभिमानी पालक रूप कुमार राठोड आणि सुनाली राठोड सांगतात की, “आम्हाला आनंद होत आहे की, आमची छोटीशी परी रीवा हिला खुद्द गणसम्रादनी लता मंगेशकर सादर करीत आहेत. तिचा म्युजिक व्हिडीओ प्रसिद्ध तबला वादक उस्ताद जाकिर हुसेन आणि मायकेल मेननार्ट यांनी निर्मिलेला असून तिच्या कामाचे अनावरण बाबा म्हणजेच पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि महाराष्ट्राच्या ‘फर्स्ट लेडी’ अमृता फडणवीस यांच्या हस्ते होते आहे.”
रीवा म्हणते की,” इतक्या महान व्यक्तींनी आपणांस लाँच करणे हा माझ्यासाठी एक प्रकारचा आशीर्वादच आहे. आणि मला ह्या गोष्टीचा अतिशय आनंद झालेला आहे.”