Marathi News
‘एकादशावतार’ ठरले कोकण चषकाचे मानकरी
कोकण कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य तसेच आमदार संजय केळकर यांच्या संयुक्त विद्यमानाने “कोकण चषक २०१८” या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे १३वे वर्ष होते. यावर्षी या स्पर्धेत मुंबई,ठाणे,रायगड,सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातून नऊ टीम सहभागी झाल्या होत्या. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उत्तम अभिनय करणारे कलाकार आहे. पण या सर्वच कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध होते असे नाही. आणि अभिनयात करियर करण्यासाठी ज्या संधी मुंबई, पुण्यासारखे शहरात उपलब्ध आहे, तशा संधी इतर शहरात नाही. त्याचमुळे कौशल्य असूनही फक्त योग्य संधी मिळत नाही म्हणून मागे पडलेले अनेक कलाकार आपल्याला सापडतील. याचमुळे या सर्व कलाकारांना सामान संधी देण्यासाठी हि स्पर्धा आयोजित केली जाते.
या स्पर्धेत कोकणातील कलाकारांचा समावेश जास्त असल्यानं याला “कोकण चषक” नाव देण्यात आले आहे. सादर स्पर्धा ११ डिसेंबर २०१८ रोजी रवींद्र नाट्यमंदिर दादर येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे अंतिम परीक्षक म्हणून अभिनेत्री अनिता दाते, भारती पाटील, अभिनेता अनिल गवस, समीर खांडेकर आणि माधव देवचक्के यांनी काम पहिले. सकाळी ९ वाजेपासून सुरु झालेली स्पर्धा संध्यकाळी ६ पर्यंत रंगली. त्यानंतर ६.30 वाजता बक्षीस वितरण समारंभ झाला. या स्पर्धेत मुंबईच्या रुईया कॉलेज च्या ‘एकादशावतार’ या नाटकाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नेपथ्य, सर्वोत्कृष्ट पार्श्र्वसंगीत असे तब्बल ५ पुरस्कार पटकावले. तर रेनबोवाला, तुरटी हि नाटक अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर विजेता ठरली. तर उत्तेजनार्थ म्हणून फायनडींग खड्डा हि एकांकिका निवडली गेली. जेष्ठ अभिनेते अशोक समेळ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले.
“महाराष्ट्राच्या विविध भागापुरते मर्यादित असलेले अभिनय कौशल्य हे अशा एकांकिका स्पर्धांमुळे सर्वासमोर येते. त्याचमुळे अशा स्पर्धाना सर्वानी प्रोत्साहित करून त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे मत अभिनेता अनिल गवस यांनी व्यक्त केले.”
याच स्पर्धांमुळे येणाऱ्या काळात लवकरच मराठी रंगभूभी,मालिका,चित्रपट यामध्ये नवनवीन चेहेरे आपल्याला पाहायला मिळतील. आणि आम्हालाही त्याच्या सोबत काम करायची संधी मिळेल याची अशा आहे. अशी इच्छा अभिनेत्री भारती पाटील यांनी बोलून दाखवली.”
“यंदा या एकांकिका स्पर्धेचे १३वे वर्ष आहे या तेरा वर्षात खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. अनेक चांगले कलाकार या कोकण चषकाच्या निमित्याने मराठी अभिनय क्षेत्रात आले. उद्याची महाराष्ट्राची रंगभूमी समृद्ध करण्याचा हा माझ्याकडून झालेला छोटासा प्रयत्न आहे.” असे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले.
हि संपूर्ण एकांकिका स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. प्रदीप ढवळ, प्रा. मंदार टिल्लू, बाप्पा राऊत, हर्षला लिखिते यांनी मेहनत घेतली.
विजेत्या संघाची यादी
सर्वोतकृष्ट अभिनय पुरुष
- प्रथम पारितोषिक – श्रीनाथ म्हात्रे, एकादशावतार
- द्वितीय पारितोषिक – शिवराम गावडे, बेफोर द लाइन
- तृतीय पारितोषिक – ओंकार राऊत, बेनिफिट ऑल डाऊट
- सर्वोतकृष्ट अभिनय स्री
- प्रथम पारितोषिक – सायली बीडकर,रेनबोवला
- द्वितीय पारितोषिक – कोमल वंजारे, तुरटी
- तृतीय पारितोषिक – मनाली राजश्री,बेफोर द लाइन
- सर्वोत्कृष्ट लेखन
- मोहन बनसोडे,चौकट