Marathi NewsNews

मुळशी पॅटर्न चित्रपट का बघावा ? जानूनं गया १५ कारणे

Mulshi Pattern

 

१. हा चित्रपट वास्तववादी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वाचा फोडणारा आहे.

२. मुळशी तालुक्यात MIDC Hill station IT Park कसे उभे राहीले हे चित्रपटात दाखवले आहे.

३. शेतकरी बेघर का झाले ,बेघर शेतकऱ्यांची मुल अशिक्षित , विनानोकरीचे कसे झाले ,गुन्हेगारीकडे कशी वळाली हे सांगणारा हा चित्रपट आहे.

४. मुळशी तालुक्यात गुन्हेगारांच उदात्तीकरण का झाल हे दिसेल.

५. गुन्हेगारी किती वाईट आहे ,खुन हा गुन्हेगारीचा शेवट असतो हे समाजात गुन्हेगारीच आकर्षण असणाऱ्यांना समजावून सांगणारा हा चित्रपट आहे.

६. मुळशीतल्या शेतकऱ्यांवर जागतिकीकरण कशाप्रकारे व का लादले हे ह्या चित्रपटातून समजेल.

७. परिस्थितीची जाण असलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने हा चित्रपट बनवला आहे.

८. दिग्दर्शक प्रविण तरडे हे मुळशी तालुक्यातले असल्याने एक सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तालुक्यातला प्रश्न समोर यावा म्हणून हा चित्रपट बनवला आहे .

९. गुन्हेगारी प्रवृत्तीचा अंत करणारा हा चित्रपट आहे.

१०. पोलिसांचे कर्तृत्व आणि ताकद दाखवणारा हा चित्रपट आहे.

११. परदेशी कंपन्या आणि राजकारणी लोकांनी मिळून कशाप्रकारे जमिनी हडप केल्या हे चित्रपटातून दिसेल.

१२. चित्रपटातील कित्येक कलाकार आणि स्वतः दिग्दर्शक प्रविण तरडे यांना नाटक आणि सिनेक्षेत्रातील कित्येक पुरस्कार मिळाले आहेत.

१३. मराठीत पहिल्यांदाच असा अस्सल आणि मातीतला वास्तववादी चित्रपट तयार केला आहे, हे सिनेमाच्या ट्रेलर वरून समजते.

१४. तसेच ही कथा जरी मुळशीतील असली तरी महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकर्यांची परिस्थिती मांडणारा हा एकमेव चित्रपट असेल.

१५. हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच शेती विकताना हजार वेळा विचार कराल, कारण ” शेती विकायची नसते, राखायची असते. ”

शेतकरी, जमीन, पैसा, गुन्हेगारी आणि शेतकऱ्याची पोरं यावर भाष्य करणारा मुळशी पॅटर्न हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबरला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button