Home > Marathi News > शिवानी सुर्वेचे महाराष्ट्रभरातले फॅन्स साजरा करतायत तिचा आज वाढदिवस

शिवानी सुर्वेचे महाराष्ट्रभरातले फॅन्स साजरा करतायत तिचा आज वाढदिवस

Shivani Surve Bday

 

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील फायटर शेरनी शिवानीचा २८ ऑगस्टला वाढदिवस असतो. बर्थडेच्या दिवशी शिवानी बिग बॉसच्या घरात असली तरी तिचे चाहते महाराष्ट्रभर तिचा वाढदिवस दणक्यात साजरा करत आहेत. फॅन्सचं शिवानीवर असलेलं प्रेम थक्क करणारं आहे. आपल्या आवडत्या शिवानीचा वाढदिवस स्पेशल व्हावा म्हणून खूप नाविन्यपूर्ण पद्धतींनी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

बिग बॉस मराठीत आता टॉप ६ मध्ये पोहचलेल्या शिवानीचा चाहता वर्ग अफाट आहे. महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, सोलापूर, उरण, मुंबई अश्या कितीतरी ठिकाणच्या चाहत्यांनी शिवानीचा वाढदिवस साजरा केला आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिक असे सगळ्या वयोगटातले निस्वार्थ प्रेम करणारे तिचे चाहतेआहेत.

 रायगड जिल्ह्यातल्या केगाव मध्ये राहणारा शिवानीचा जबरा फॅन निनाद म्हात्रे जो गाडीवर ‘शिवानी स्टाईल’ स्टिकर लावल्यामुळे चर्चेत आला होता. त्याने शिवानीचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी परत एकदा खूप मेहनत घेतली आहे. तो राहत असलेल्या गावात कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीयेत. तरी शिवानीसाठी खास शहरात जाऊन वाढदिवसाच्या  दिवशी सकाळी निनाद केक, ग्रिटिंग कार्ड घेऊन आला. त्याने शिवानीसाठी खास पत्र लिहिलंय. वाढदिवसाचा आनंद केक कापून साजरा केल्यावर निनाद म्हणाला, “मी शिवानी सुर्वेचा खूप मोठा चाहता आहे. तिच्या प्रेमापोटीच मी माझ्यासारख्या चाहत्यांचा शिवानीयन्स हा ग्रुप बनवला आहे. बिग बॉस मराठी सीजन २ ची ट्रॉफी शिवानीनेच जिंकावी अशीआम्हा सर्व चाहत्यांची इच्छा आहे. ती बिग बॉस जिंकल्यावर तिचा ट्रॉफी हातात घेतलेला मोठा फोटो मी माझ्या घराच्या भिंतींवर लावणार आहे. तिला वाढदिवसासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी आम्हा सर्व चाहत्यांकडून शुभेच्छा.  ”

साताऱ्यात राहणाऱ्या आसावरी कर्वेने आपल्या लहान मुली आणि पतीसह थेट कास पठारावर जाऊन शिवानीच्या वाढदिवसानिमीत्त केक कापला आहे. आसावरी म्हणाली, “ शिवानी बिग बॉसची ट्रॉफी तू जिंकून ये. तू जिंकावीस म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतेय. आम्ही सातारकर तू ट्रॉफी घेऊन येण्याची वाट पाहत आहेत. मला पूर्ण खात्री आहे कि बिग बॉसची विजेता तूच होणार आहेस.”

शिवानीने तिची छाप लहान मुलांवरही पाडली आहे.  शिवानीची सातवीत असलेली एक फॅन आहे. या छोट्या  चाहती स्वानंदी धोत्रेने आपल्या लाडक्या शिवानीताईचं खूप सुंदर पेंटिंग बनवलं आहे. स्वानंदी म्हणते, “शिवानीताई खूप स्ट्राँग आहे. मी पण तिच्यासारखी स्ट्राँग होणार. मला ती खूप आवडते. ती सगळे टास्क जबरदस्त खेळते. बिग बॉसची ट्रॉफी शिवानीताईच जिंकेल, असा मला विश्वास आहे.”

स्वप्निल सोनावणे ह्या शिवानीच्या चाहत्याने वाढदिवसानिमित्त तिचं पोर्ट्रेट फ्रेम केलेलं आहे. हि फ्रेम त्याने शिवानीच्या आईला घरी जाऊन दिली असल्याचे सांगताना तो म्हणाला, की, “शिवानीला मी कायम सपोर्ट करतो. ती खूप छान खेळते. माझी फेवरेट स्पर्धक आहे. बिग बॉसची ट्रॉफी तिनेच जिंकायला हवी.”

सागर वाघमारे नावाच्या चाहत्याने तर शिवानी जिंकण्यासाठी नवस केला आहे. तो सांगतो, “ शिवानी जिंकली तर मी लालबागच्या गणपती दर्शनाला अनवाणी जाणार आहे तसेच दर शुक्रवारी उपवास देखील करणार आहे.”

ट्विटरवर #ShivaniSurveDeservesToWin हा हॅशटॅग सध्या चांगलाच ट्रेंड होतोय. त्यांची आवडती शिवानी बिग बॉस मराठीचा सीजन २ जिंकावी म्हणून चाहते प्रयत्नशील आहेत. शिवानी सुर्वेचं हे फॅन फॉलोविंग बघता, शिवानी यंदाच्या बिग बॉस सीजनची विजेती ठरली,  तरी नवल वाटून घेऊ  नका.

About justmarathi

Check Also

sonali kulkarni

सोनाली कुलकर्णीची मध्यवर्ती भूमिका असलेला आणि सौरभ वर्मा दिग्दर्शित ‘विक्की वेलिंगकर’ मराठी चित्रपट ६ डिसेंबर २०१९ रोजी होणार प्रदर्शित

  वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!” अशा आशयाचे ‘विक्की वेलिंगकर’चे पोस्टर …

Leave a Reply