FeaturedMarathi News

जॅकलीन फर्नांडीस आणि सलमान खानने जिंकली रेस.. इंस्टाग्रामवर बनले नंबर वन !

 

रेस 3 च्या रिलीजनंतर जॅकलीन फर्नांडीस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलीय. गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर जॅकलीन आपला को-स्टार सलमान खानसह सगळीकडे दिसतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या आकडेवारीच्यानूसार, इंस्टाग्रामवर सध्या रेस-3 चित्रपटाची ही जोडी नंबर वन आहे.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मीडिया टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिलेली आहे. रेस-3च्या प्रमोशनमध्ये सगळीकडे दिसलेली जॅकलीन दबंग टूर दरम्यानही आपल्या इन्स्टा स्टोरीजव्दारे आपल्या फॉलोवर्सचे लक्ष वेधून घेत होती. तर दबंग खान गेल्या काही दिवसांमध्ये रेस-3, ईद सेलिब्रेशन, दस का दम आणि दबंग टूरच्यामूळे लोकप्रियतेच्या शिखरावर राहिला.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “जॅकलीन आपल्या इन्स्टा-पोस्ट आणि इन्स्टा स्टोरीजसाठी खूप लोकप्रिय आहे. रेस-3च्या प्रमोशनच्यावेळी आणि दबंग टूरच्या दरम्यान जॅकलीनने शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीजच्यामूळे इन्स्टाग्रामवर तिची लोकप्रियता सर्वाधिक दिसून आलीय. सलमान खानच्या प्रत्येक इन्स्टा फिडला मिळालेल्या लाखों लाइक्स आणि प्रत्येक पोस्टवर येणा-या हजारों कमेंट्सवरून सलमान खानची पॉप्यूलॅरिटी दिसूनच येते. म्हणूनच हे दोघेही इन्स्टाग्रामवर नंबर वन ठरलेत.“

Related Articles

Leave a Reply

Back to top button