Marathi Trends
सुमेध मुदगलकर लवकरच दिसणार रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये
सध्या हिंदी टेलिविजनविश्वात ‘राधा-कृष्ण’ ह्या बिगबजेट मालिकेतून दिसणारा चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर लवकरच एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार असल्याचं समजतंय.
चित्रपटसृष्टीतल्या सूत्रांच्या अनुसार, “व्हेंटिलेटर, मांजा आणि बकेट लिस्ट ह्या यशस्वी चित्रपटांमधून मराठी सिनेसृष्टीत तो लोकप्रिय झाला. एकही रोमँटिक फिल्म न करताही आपल्या देखण्या चेह-यामूळे तो आज लाखो तरूणींच्या ‘दिल की धडकन’ आहे. आता तो पहिल्यांदा एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. आणि तो ही रोमँटिक अंदाजात.”
सुमेधच्या जवळच्या सूत्रांनूसार, “सुमेधच्या कमालीच्या देखण्या आणि घायाळ करणा-या लूक्समूळेच त्याला कृष्णाची भूमिका मिळाली. आणि ह्या पौराणिक हिरोच्या त्याच्या रोमँटिक रूपानंतर आजच्या तरूणाच्या रोमँटिक अंदाजात सुमेध त्याच्या चाहत्यांसमोर ह्या अल्बममधून लवकरच येईल.”