Marathi Trends

लग्नाची तारीख जाहिर केल्यानंतर दीपिका-रणवीर बनले इन्टाग्राम वर नंबर वन !

Deepika_Ranveer insta no.1

 

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाविषयी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून दिसणा-या तर्क-वितर्काच्या बातम्यांना पूर्णविराम लावत दीपिका-रणवीरने आपल्या लग्नाची तारीख इन्स्टाग्रामवरून जाहिर केली. ह्यामूळे दोघांचीही इंस्टाग्रामवर सध्या सर्वाधिक लोकप्रियता दिसून येते आहे

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. ह्या आकडेवारीनूसार, दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने 100 गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अग्रणी स्थानी आपली वर्णी लावली आहे. बॉलीवूडमधल्या ह्या बहूचर्चित जोडीच्या लग्नाची वाट त्यांचे चाहते खूप काळापासून पाहत होते. आणि आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामवरून दीपिका-रणवीरने दिलेल्या सुखद वृत्तानंतर इंस्टावर दीपिका-रणवीरच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “दीपिका-रणवीरने इंस्टाग्रावरून आपल्या लग्नाची घोषणा केली.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब-याच लोकांनी ही पोस्ट वाचली, लाइक आणि शेअर केली. ज्यामूळे त्यांच्या रँकिंगवर बराच फरक पडला आहे. “

 अश्वनी कौल पूढे म्हणतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

रणवीरच्याशिवाय  अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खानसुध्दा स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इंस्टाग्राम रँकिंगमध्ये लोकप्रिय होते. तसेच, दीपिकाच्याशिवाय प्रियंका चोपड़ा, अनुष्का शर्मा, जैकलिन फर्नांडीज आणि सोनम कपूर स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या इंस्टाग्राम रँकिंगवर पहिल्या पाच लोकप्रिय तारकांमध्ये होत्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button