Marathi NewsUpcoming Movies 2024

प्रिया आणि अभयने व्यक्त केले गाण्याद्वारे ‘गच्ची’वरील आपले प्रेम

तरुणाईसाठी गच्ची’ म्हणजे त्यांच्या बालपणीची आठवणी जपणारी जागा. आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी हवा असलेला निवांतपणा ही गच्ची’ देते. याच गच्चीवर आधारित लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांची निर्मिती असलेला ‘गच्ची’ हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गच्चीवर आत्महत्या करायला चाललेल्या व्यक्तीला, ‘गच्चीवरच आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन देणाराहा चित्रपट आपल्या भेटीस येत आहे. अभय महाजन आणि प्रिया बापट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रमोशनल साँग लाँच करण्यात आले.

प्रिया बापट आणि अभय महाजन यांनी गायलेले प्रमोशनल साँग आपापल्या गच्चीबद्दल आपुलकी निर्माण करणारे आणि गच्चीवरच्या आठवणी ताज्या करणारे ठरत आहे. प्रियाच्या आवाजातील हे प्रमोशनल साँग तिच्या चाहत्यांना मोठी पर्वणी ठरत आहे. विशेष म्हणजेअभयची गाण्याची हि पहिलीच वेळ असली तरीप्रियासोबत गाताना त्यानेदेखील गाण्याची भरपूर मज्जा लुटली असल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हीडीयोमधून दिसून येते. प्रिया आणि अभय गात असलेला हा व्हिडियो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असून, तरुणाईला नकळत ताल धरायला लावणा-या या प्रमोशनल साँगची खास स्टेपसुध्दा अभय आणि प्रियाने आपल्या व्हीडीओमार्फत लोकांपर्यंत पोहोचवली आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या ठेक्यावर प्रेक्षकसुद्धा थिरकताना  दिसून येत आहे. ‘अनोळखी तूमी आणि गच्ची’ या हटके गाण्याचे बोल ओमकार कुलकर्णी यांनी लिहिले आहे, तर अविनाश विश्वजीत यांनी ते संगीतबद्ध केले आहे. विशेष म्हणजे या गाण्यात अनोळखी असा शब्द जरी असला, तरी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या व्हीडीओमध्ये प्रिया, अभयची मस्तीवाली मैत्री दिसून येत असल्यामुळे हे साँगदेखील अगदी मजेशीर बनले आहे. 

गच्चीप्रेमींसाठी हे गाण त्यांच्या हृदयाला भिडणार असेलपरंतू गच्चीशी कधीच संबंध न आलेल्यांनादेखील  गच्चीचा हेवा वाटू लागेलअसे हे गाणे आहे. आयुष्याची नवी वाट चोखाळणाऱ्या या गच्चीवर आधारित असलेलानचिकेत सामंत दिग्दर्शित हा सिनेमा, ‘गच्चीचे असेदेखील एक वेगळेपण आपल्यासमोर घेऊन लवकरच येत आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात दडलेल्या पर्सनल स्पेसला विशेष महत्व निर्माण करून देईलयात शंका नाही. 

SONG LINK – https://www.youtube.com/watch?v=StYpLfBtj-4

Related Articles

Leave a Reply

Back to top button