Marathi NewsNews

एन्टरटेन्टमेंट ट्रेड मासिक अवार्ड-२०१६ च्यावतीने विविध क्षेत्रातील कलागुणांचा सन्मान

????????????????????????????????????

क्षेत्र कोणताही असो, त्या क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण करणारे अनेक व्यक्तिमत्व आपल्या समाजात पाहायला मिळतात, त्यांच्या याच कामाची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थेकडून या व्यक्तीमत्वांचा सत्कार केला जातो.

एन्टरटेन्टमेंट ट्रेड मासिकला ५ वर्ष पूर्ण झाल्याच्या वतीने एन्टरटेन्टमेंट ट्रेड मासिक अवार्ड-२०१६ या अवोर्डची सुरुवात एन्टरटेन्टमेंट ट्रेडचे संपादक प्रकाशक एन.पी यादव यांनी केली. या कार्यक्रमांतर्गत दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

चित्रपट, सामाजिक, क्रीडा, वैद्यकीय आणि औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांचा या सन्मान सोहळ्यात समावेश होता. अतिशय आलिशान आणि आल्हाददायी वातावरणात पार पडलेल्या या सन्मान सोहळ्यात हिंदी आणि मराठी जगतातील अनेक नामवंत कलावंतांनी देखील हजेरी लावली होती.

सिनेकलावंतांच्या लखलखीत बहरलेल्या या सोहळ्यात धनराज पिल्ले यांची विशेष उपस्थिती होती. क्रीडाक्षेत्रात विशेष कर्तृत्व गाजवल्यानिमित्त मँजिशियन ऑफ हॉकी या सन्मानाने गौरविण्यात आले. तर बॉलिवूडचे जान असणारे धर्मेंद्रजी यांना द रिअल हिरो इंडिअन सिनेमा हा सन्मान देण्यात आला. रविना  टंडन  यांना  ब्युटी  अँड  टेलेंट  विथ  ह्यूमन टच हा पुरस्कार देण्यात आला.  तर  सचिन पिळगांवकर  याना मोस्ट एव्हरग्रीन अँड वर्सेटाईल पर्सनेलिटी ऑफ  इंडियन सिनेमा या पुरस्काराने तर सोनाली कुलकर्णी हिला वोलकॅनो ऑफ टॅलेन्ट या पुरस्काराने नावाजले गेले. तसेच मराठीची चुलबुली अभिनेत्री किशोरी शहाणे यांना त्यांच्या फिट अँड फाईन व्यक्तिमत्वावरून फिटनेस आयकॉनने सन्मानित करण्यात आले . भरत  जाधव  यांना द मॅन हू रिवायव्हड मराठी सिनेमा तसेच पंकज  उधास यांना किंग ऑफ गझल्स या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, शिवाय  अलका कुबल , स्मिता  गोंडकर , मानसी  नाईक, श्रिया पिळगावकर, सुनील पाल इत्यादी मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. सामाजिक विशेष कामगिरी बजावणारे पोपटराव पवार आणि शिल्पा गोंजारी यांना देखील विशेष सन्मानाने गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा केळकर आणि प्रसाद फणसे यांनी केले. पुष्कर जोग, अंकिता तारे, सिद्धेश पै, सॅड्रीक डीसुजा, सुकन्या काळन आणि नृत्यसम्राज्ञी मानसी नाईक हिच्या डान्स परफॉर्मन्स कार्यक्रमात जान आणली. तसेच धनश्री देशपांडे, सुप्रिया जोशी या गायकामुळे सोहळा सुरमय वातावरणात पार पडला.  तसेच  संजय लोंढे यांच्या शांताबाई या गाण्यावर लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे हिने ठेका धरला, तसेच तिच्या ठेकावर प्रेक्षकांना देखील थिरकण्याचा मोह आवरला नाही,

Related Articles

Leave a Reply

Back to top button