Marathi Trends

सोनालीच्या घरी आला ‘बाप्पा’

sonali kulkarni
sonali kulkarni

पोस्टर गर्ल सोनाली कुलकर्णीच्या पुण्याच्या घरी ‘बाप्पा’ विराजमान झाले आहेत. पुणेकर असलेल्या कुलकर्णी कुटुंबातील हा पिटुकला बाप्पा,गोंडस आणि गोजिरा दिसतो. आपल्या आगामी सिनेमाच्या शेड्युलमधून वेळ काढत सोनालीने आपल्या कुटुंबीयांसोबत पारंपारिक पद्धतीनुसार घरच्या गणपतीचे स्वागत केले.

निगडी येथील तिच्या निवासस्थानी १२ दिवस विराजमान असणा-या या बाप्पाच्या सेवेसाठी ती व्यस्त आहे. ‘आमच्या घरी गेल्या तीस वर्षापासून शाडूची मूर्ती विराजमान होते. पर्यावरणपूरक प्रतिष्ठापना करण्यावर प्रत्येकांनी भर द्यायला हवा. माझ्या घरचा गणपती आम्ही महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या विसर्जन हौदमध्ये विसर्जित करतो’.

असे सोनाली सांगते. गणेशोत्सवाच्या कालावधीत बाप्पा दरवर्षी मला भरभरून देतो. असे देखील ती पुढे सांगते.  तिचा लवकरच ‘तुला कळणार नाही’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. बाप्पाच्या विसर्जनानंतर ती पुन्हा या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी स्वतःला झोकून देणार आहे. ‘बाप्पाचा आशीर्वाद सर्व भक्तांवर असाच सदैव राहू दे’ अशी प्रार्थना ती विघ्नहर्त्याकडे करते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button