लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर सई ताम्हणकरचा जलवा !
सई ताम्हणकरची फिल्म लव्ह सोनियाचा गुरूवारी लंडनला प्रिमीयर झाला. लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलची ओपनिंग फिल्म म्हणून सईची लव्ह सोनिया सिलेक्ट झाली होती. फेस्टिव्हच्या ओपनिंग सेरेमनीला रेड कार्पेटवर झाराच्या आउटफिटमध्ये सई ताम्हणकर आली.
मराठी फिल्म इंडस्ट्रीतली सई ताम्हणकर पहली अभिनेत्री आहे, जिला लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर वॉक करायचा मान मिळाला. सईसोबत रिचा चड्ढा, राजकुमार राव, मृणाल ठाकूर, मनोज बाजपेयी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक तबरेज नुरानी सुध्दा रेड कार्पेटवर दिसून आले.
ह्यावेळी इंटरनॅशनल मीडियाशी बोलताना सई म्हणाली, “ माझ्या आजवरच्या प्रवासात बरेच चढ-उतार आले. पण ह्याक्षणी मागे वळून पाहताना त्या चढ-उतारांचे चीज झाल्याचे दिसते आहे. ह्या सिनेमाने मला जास्त सतर्क आणि संवेदनशील बनवले. प्रत्येकाने ही फिल्म पहावी असं मला वाटतं. ह्या सिनेमातलं कथानक हृदयस्पर्शी आहे. ह्या सुंदर इंडो-वेस्टर्न सिनेमाचा मी एक हिस्सा असल्याचा आणि हा चित्रपट लंडन इंडरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा भाग असल्याचा मला अभिमान आहे.”