नवरा-बायकोचे अव्यक्त प्रेम मांडणारे ‘तुला कळणार नाही’ महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित

Tula Kalnar Nahi
Tula Kalnar Nahi

सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेला ‘तुला कळणार नाही’ हा सिनेमा येत्या ८ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित या सिनेमात राहुल- अंजली या रोमांटिक कपलची लग्नानंतरची मराठमोळी कहाणी आपल्याला पाहता येणार आहे.  सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची यात प्रमुख भूमिका असून. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शूट करण्यात आल असुन नागपूर मध्ये  देखील चित्रपटाचे काही सीन शूट करण्यात आले आहेत.  पोस्टर पहिला तर, ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी नवरा-बायकोमधील केमिस्ट्री आपणास दिसून येईल. ‘मोडीत निघालेल्या ओढीची… गोष्ट वेड्या जोडीची…’ असे सबटायटल असलेल्या या पोस्टरवर सुबोध आणि सोनालीला बांधले असल्याचे दिसून येते. या सिनेमाचे शीर्षकगीतदेखील तेवढ्याच ताकदीचे बनवण्यात आले आहे. रोमेंटिक बाज असलेल्या या शीर्षकगीताचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून, संगीतदिग्दर्शन अमितराज यांनी त्याला चाल दिली आहे. स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपालने गायलेले हे गीत, वैवाहिक दाम्पत्यांना आपलेस करण्यास यशस्वी ठरत आहे.

या सिनेमाचा ट्रेलरदेखील भरपूर गाजत आहे. नवरा-बायकोच्या नात्यातील रुसवा-फुगवा, अनामिक ओढ आणि एकमेकांवरचे अबोल प्रेम दाखवणारा हा ट्रेलर घराघरातील प्रत्येक जोडप्याला आपलासा करतो.  वैवाहिक नात्यात बांधलो गेले असल्यामुळे, सोडता येत नाही आणि पकडतादेखील येत नाही अशी गत आपल्यापैकी अनेकांची झाली असते. त्यावेळी ते कोणता मार्ग निवडतात? जोडीदारांचे वाढते अहंकार आणि त्यासोबतच वाढत जाणा-या अव्यक्त प्रेमाची जाणीव, या द्वंदात अडकलेल्या जगातल्या प्रत्येक नवराबायकोची सुंदर कथा या ट्रेलरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे या सिनेमाच्या ट्रेलरमधील सुबोध- सोनालीची केमिस्ट्री अगदी चांगली जुळून आली असून, त्यांच्या चाहत्यांना राहुल अंजलीची ही लग्नानंतरची लव्हस्टोरी भरपूर आवडेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
नुकत्याच या सिनेमाच्या म्युझिक अल्बमचे लालबागच्या राजाच्या चरणी लाँच करण्यात आले.  त्यामधील अश्विनी शेंडे लिखित ‘मिठीत ये’, आणि ‘माझा होशील का’ ही गाणी देखील रसिकांना आवडतील, अशी आशा आहे. पती-पत्नीच्या नात्याची नाजूक गुंफण मांडणारी हि रोमेंटिक गाणी, निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केली असून, नवदाम्पत्यांसाठी ती पर्वणी ठरणार आहे. यातील ‘मिठीत ये’ या गाण्याला जानवी प्रभू अरोराचा आवाज लाभला आहे, तर मिहीरा जोशी आणि स्वप्नील बांदोडकरने जोडीने ‘माझा होशील का’ गाण्याचे ड्युएट गायले आहेत.
या सिनेमाची आणखीन एक खासियत म्हणजे मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी यात निर्मात्याच्या भूमिकेत असून, अनेक सुपरहिट सिनेमांचे वितरक आणि निर्माते असलेल्या कार्तिक निशानदार आणि अर्जुन बरन या जीसिम्सजोडीसोबत तो पुढील प्रवासातदेखील कायम राहणार आहे. तसेच श्रेया योगेश कदम ह्यांचादेखील निर्मितीत महत्वाचा हात असून,  निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार यांनी सहनिर्मितीची धुरा सांभाळली आहे. लग्नानंतरची प्रेमकहाणी सांगणारा हा  सिनेमा उद्यापासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

About justmarathi

Check Also

Bonus marathi movie trailer

Trailer of the Bonus was unveiled

Trailer of the Bonus was unveiled in a glittering function, Featuring glamorous couple Gashmeer Mahajani …

Leave a Reply