Marathi NewsNews

टॅटूच्या स्वरुपातून चाहत्याने स्वप्नील जोशीला दिली आगळी-वेगळी प्रतिक्रिया/भेट

swapnil Joshi fan

मायबाप रसिक प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन करण्यासाठी प्रत्येक कलाकार हा त्याच्या-त्याच्या परीने प्रयत्न करत असतो. कधी नाटक, चित्रपट, मालिका तर कधी वेब सिरीजच्या माध्यमातून हे एंटरटेनमेंट चालूच राहते. प्रेक्षक देखील कलाकारांच्या अभिनय कौशल्याची आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीची प्रत्येकवेळी मनापासून दाद देतात. हल्ली, सोशल मिडीयामुळे आपल्या प्रतिक्रिया, विशेष शुभेच्छा कलाकारापर्यंत लगेच पोहचण्यास मदत होते आणि अनेक कलाकार हे त्यांच्या-त्यांच्या परीने प्रेक्षकांची संवाद साधण्याचा देखील प्रयत्न करतात. ‘प्रेक्षकांमुळे आज आम्ही आहोत, त्यांच्या प्रेमामुळे आणि पाठींब्यामुळेच आमचे एवढे नाव आहे’, असं मानणारा कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामध्ये भावनेची इतकी जवळीक निर्माण होते की आपले कलाकारावर किती प्रेम आहे हे देखील प्रेक्षक विविध पध्दतीने दाखवून देतात.

नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशीचे कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा, अप्रतिम अभिनय कौशल्य आणि प्रेक्षकांना सतत खूश ठेवण्याची धडपड यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे; अर्थात स्वप्नीलवर जिवापाड प्रेम करणारे प्रेक्षक भरपूर आहेत जे प्रत्येकवेळी त्याच्या भेटीसाठी आणि नवीन प्रोजेक्टसाठी मनात इच्छा व्यक्त करत असतात, आपल्या प्रतिक्रिया सतत त्याच्यापर्यंत पोहचतील यासाठी प्रयत्न पण करत असतात. त्यापैकी करुणा कदम आणि स्वप्नील शिंदे या चाहत्याने टॅटूच्या स्वरुपातून दाखवले आहे की ‘स्वप्नील जोशी हा त्याचा फेव्हरेट आहे’. शरीरावर कायम स्वरुपी टॅटू काढणे हे तितके सोपे नाही, एक खूण आपल्यासोबत आयुष्यभर राहणार असते आणि हे माहित असूनही या करुणा कदम आणि स्वप्नील शिंदे यांनी टॅटू काढले यावरुन हे नक्कीच सिध्द होतं की याचे स्वप्नीलवर आणि त्याच्या कामावर खूप प्रेम आणि विश्वास आहे की स्वप्नील दादू असंच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत राहणार.

अर्थात हे टॅटू पाहिल्यावर, स्वप्नील जोशी देखील भावूक झाला आणि प्रेक्षकांचे आपल्यावर इतके प्रेम आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली. या जाणीवेमुळे आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे कामाची जबाबदारी अजून वाढली असून ती मी योग्यरित्या पेलणार आणि प्रेक्षकांना कधीही निराश करणार नाही, असा निर्णय स्वप्नील जोशीने घेतला.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button