News

आयुष्याच्या नव्याने प्रेमात पाडणारा सचिन पिळगांवकरांचा नवा सिनेमा ‘लव्ह यू जिंदगी’

 

कुणाला आनंद वयाप्रमाणे वागण्यात मिळतो तर कुणाला वय विसरून वयात आल्यासारखं वागण्यात… इथूनच सुरू होतात गंमती-जमती… आणि शेवटी या दोघांच्याही तोंडी शब्द येतात ‘लव्ह यू जिंदगी’…! याच प्रत्येकाची कथा एस. पी. प्रॉडक्शन्स निर्मित आगामी मराठी सिनेमा ‘लव्ह यू जिंदगी’ मधून पाहायला मिळणार आहे. ज्याचं पोस्टर नुकतंच सोशल मीडिया च्या माध्यमातून लाँच करण्यात आलं. या पोस्टरवर वरिष्ठ नागरिकांच्या विभागात मोडणारा एक सामान्य गृहस्थ दिसतो . हा गृहस्थ दुसरा कोणीही नसून चिरतारूण्याचंचं वरदान लाभलेले आपल्या सगळ्यांचेच लाडके सचिन पिळगांवकर आहेत. या पोस्टर च वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण पोस्टरवर वेगवेगळ्या भाषांमध्ये दिसणारं प्रेम….

एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित या चित्रपटाची निर्मिती सचिन बामगुडे यांनी केली आहे. तर गेली 17 वर्ष झी टीव्ही, झी सिनेमा आणि झी मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे मनोज सावंत या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. दिग्दर्शनाबरोबरच कथा आणि पटकथालेखन ही मनोज सावंत यांनी केलं आहे.

वय विसरून बेभान होणाऱ्या याच तरूण मनांना आपल्याकडे आकर्षित करणारा ‘लव्ह यू जिंदगी’ हा चित्रपट 14 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button