‘साथ दे तू मला’त लग्न प्रारंभ !!

 

स्टार प्रवाह वरील साथ दे तू मला’ ही मालिका वेगळे वळण घेते आहे,शारदाने तिच्या अपेक्षांना पुरेपूर उतरलेली प्राजक्ता हातची जाऊ नये म्हणून उद्याच्या उद्या लग्न,हॉल मिळाला नाहीतर घरात करा,पण लग्न ताबडतोब करा,असा फतवा काढल्याने हे लग्न शनिवारपासून सुरू झाले आहे.

‘समीर -प्राजक्ताचे नाते घेणार नवे वळण’ अशी या लग्नाची टॅगलाईन प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी असून हे अचानक लग्न नेमके कसे होत याची चर्चा प्रेक्षकांमध्ये आहे.

‘लग्न प्रारंभ’ असे निमंत्रण आणि लग्नाची सनसनाटी सुरवात यामुळे या लग्नात काय काय घडेल याबद्दल ही चर्चा आहे.

अभिनय संपन्न युवा अभिनेत्री वेदांगी कुळकर्णी प्राजक्ताच्या भूमिकेत दिसणार असून युवा रंगभूमीवरचा हा गोड चेहरा सविता प्रभुणे,प्रिया मराठे,आशुतोष कुलकर्णीपियुष रानडे ,अरुण नलावडेमेघना वैद्यरोहन गुजर या नामवंत कलावंतांसोबत या नव्या वळणावर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

साथ दे तू मला’ ही मालिका रोज संध्याकाळी साडे सात वाजता स्टार प्रवाह वर आणि कधीही हॉटस्टारवर प्रेक्षकांना पाहता येईल.

Exit mobile version