Blog Layout

वन शॉटमध्ये सीन पूर्ण करताना आणि ‘निलांबरी’चं निळू भाऊ करताना होणार हास्य कल्लोळ

JmAMP   एकीकडे वन शॉटमध्ये सीन शूट करण्याच्या दरम्यान, दिग्दर्शकाकडून कलाकाराला डायलॉग नेमका कसा बोलला गेला पाहिजे  हे सांगताना उडणारी धमाल आणि त्यानंतर कलाकाराचे झालेले कनफ्युझन यामुळे हास्य कल्लोळ माजेल हे नक्की. तर दुसरीकडे मुलाखती दरम्यान, ‘निलांबरी’ या एका साध्या-सोप्या नावातून निळू भाऊ, निल आर्मस्ट्राँग अशी नावं चुकून उच्चारली जाणे म्हणजे आत्मविश्वास कमी असल्याचे …

Read More »

‘डोक्याला शाॅट’चा भन्नाट टिझर प्रदर्शित

DOKYALA SHOT - डोक्याला शाॅट

JmAMP मराठी सिनेसृष्टीला एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ आता लवकरच शिवकुमार पार्थसारथी दिग्दर्शित ‘डोक्याला शॉट‘ हा भन्नाट चित्रपट घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. यात गणेश पंडित, सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहेत. यावरून हा सिनेमा मैत्री, …

Read More »

लकी सिनेमाचे टायटल ट्रॅक झाले रिलीज, पहिल्यांदाच एकत्र आले सई,तेजस्विनी, सिध्दार्थ आमि उमेश !

Luckee

JmAMP   बी लाइव्ह प्रस्तूत, लकी सिनेमाचे टायटल ट्रॅक नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात लाँच झाले. अभय महाजन-दिप्ती सती ह्या लकी कपल सोबतच सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिपक पांडुरंग राणे, दिग्दर्शक संजय जाधव, गायक अमितराज आणि सुपरस्टार सई ताम्हणकर-सिध्दार्थ जाधव ह्यावेळी उपस्थित होते. पूण्यात झालेल्या ह्या सोहळ्याला पूणेकरांची अभूतपूर्व गर्दी लोटली …

Read More »

स्वप्नांना मिळणार ज्ञानाची जोड ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व’ सोनी मराठीवर

JmAMP   नशिबावर सगळं काही निर्भर असतं म्हणणाऱ्यांना आपलं नशिब बदलण्याची सुवर्णसंधी सोनी मराठी देत आहे. आणि त्यासाठी केवळ तुमच्या ज्ञानाचं शस्त्र योग्यरित्या वापरण्याची गरज आहे. आपल्याबुध्दीच्या जोरावर सगळं काही शक्य आहे, याचंच प्रतिक देणारा कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेली कित्येक वर्ष सोनी टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांनास्वप्नपूर्तीची वाट दाखवत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनाही आपल्या स्वप्नांचा महाल बांधता यावा म्हणून सोनी मराठी आता ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व घेऊन येत आहे. कौन बनेगा करोडपतीच्या यशात ह्या कार्यक्रमाच्या  सूत्रसंचालनाचा खूप मोठा महत्वाचा वाटा  असतो.ह्या पर्वाचा सूत्रसंचालक कोण असणार ? दरवेळी वेगवेगळी थीम असणाऱ्या कौन बनेगा करोडपती याकार्यक्रमाची मराठी थीम कोणती असणार?आणि स्पर्धकांच्या मदतीसाठी लाईफलाईन्स कोणत्या असणार? असे अनेक प्रश्न  आता सगळ्यांच्या मनात आहेतच.  यासगळ्याच गोष्टी हळूहळू उलगडणारआहेत… लवकरच सोनी मराठीवर येणाऱ्या ‘कोण होणार करोडपती’ च्या नव्या पर्वात…

Read More »

पूणेकरांनी दिले संजय जाधव ह्यांच्या ‘लकी’ कपलला भरघोस प्रेम

संजय जाधव - लकी

JmAMP बी लाइव्ह प्रस्तूत ‘लकी’ सिनेमाच्या स्टारकास्टने नुकतीच पूण्याच्या पत्रकारांची भेट घेतली. लकी सिनेमाचे निर्माते सुरज सिंग, दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता अभय महाजन, अभिनेत्री दिप्ती सती आणि गायक चैतन्य देवढे ह्यांनी पुण्यातल्या पत्रकारांशी संवाद साधला. दुनियादारी, तू हि रे, प्यारवाली लव्हस्टोरी, गुरू, येरेयेरे पैसा अशा सुपरहिट सिनेमांचे दिग्दर्शन केलेले फिल्ममेकर संजय जाधव म्हणाले, “पूण्यातल्या पत्रकारांशी संवाद साधायला मला खूप आवडतं. …

Read More »

मृणाल कुलकर्णीच्या रॉम-कॉम ‘ती and ती’चे ट्रेलर प्रदर्शित; पुष्की, प्रार्थना, सोनाली यांचे इंटरेस्टिंग लव्ह ट्रँगल

Ti And Ti

JmAMP मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘ती and ती’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची एक छोटीशी झलक पाहण्यास आतुर झाले होते. मोशन पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता किती वाढवली हे सोशल मिडीयावर मिळालेल्या प्रतिक्रियांवरुन दिसून आले आणि खास प्रेक्षकांसाठी नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीझ करण्यात आला आहे. पुष्कर जोग, प्रार्थना बेहरे …

Read More »

दाक्षिणात्य “आय” मुव्ही फेम कामराज चे मराठीत पदार्पण

Shiva Marathi Movie Music Launch

JmAMP नवीन वर्षात तुफान, धडाकेबाज आणि जोशपूर्ण असा “शिवा – एक युवा योद्धा” सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येत्या १५ फेब्रुवारी २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचा म्युझिक आणि ट्रेलर लॉंच सोहळा अनोख्या पद्धतीने पार पडला. पत्रकारिता क्षेत्रातील वरिष्ठ मंडळी लोकमतचे संपादक विनायक पात्रुडकर आणि माझी सहेली मासिकाचे संपादक दीपक खेडकर, एसजीएस …

Read More »

Ti Fulrani Marathi Serial : मंजूने उचलला आहे शिकायचा विडा – उत्तरोत्तर फुलत चालली महाराष्ट्राची ‘ती फुलराणी’

Ti Fulrani Marathi Serial

JmAMP शिक्षण एक असं शस्त्र आहे ज्याने माणूस समृध्द होतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि आपली मतं ठामपणे मांडण्याची वृत्ती विकसित होते. यासगळ्याचंच प्रात्यक्षिक सध्या सोनी मराठीवरील ‘तीफुलराणी’च्या माध्यामातून आपण अनुभवत आहोत. एका गरीब कुटुंबातील मुलीची शिक्षणासाठीची आवड, ते मिळवण्यासाठीची तिची जिद्द आणि याच जिद्दीपायी आपल्या परिस्थितीवर मात करतघेतलेलं शिक्षण…ही आहे ‘ती फुलराणी’तल्या मंजूची गोष्ट. आपल्या शिक्षणाचा खर्च सुटावा म्हणून देशमुखांच्या घरात घरकाम करणाऱ्या मंजूला, “नोकरांनी शिक्षणाचं स्वप्न पाहू नये!”, असा सल्ला या देशमुखांनी दिला होता. मात्र आपल्या शिक्षणाप्रती असलेलीचिकाटी कायम ठेवत, श्रीमंतीचा माज असणाऱ्या देशमुखांना चांगलाच धडा शिकवण्याच्या उद्देशाने मंजूने शिक्षणात उत्तरोत्तर प्रगती केली आहे. शिक्षणात झालेली प्रगती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाचआत्मविश्वास घेऊन आली आहे. हा आत्मविश्वास या फुलराणीच्या मोनो लॉगमधून सोशल मिडियावर सध्या चांगलाच गाजतो आहे. आपल्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या मंजूवर शौनक चा जीव जडला… त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत गेला आणि या दोन भिन्न प्रवृत्तींमधील दरी वाढत्या शिक्षणाने भरून काढली. एकमेकांच्या प्रेमातअसणाऱ्या या दोघांच्या नात्याला देशमुख परिवार स्वीकारणार की नाही? आपल्या प्रेमाखातर मंजू शौनकची सोबत सोडणार की नातं टिकवण्यासाठी देशमुखांच्या दाराचा उंबरठा ओलांडणार? यासगळ्याच प्रश्नांबरोबर देशमुखांना धडा शिकवण्यासाठी मंजू काय-काय करणार? जाणून घेण्यासाठी पहात रहा ‘ती फुलराणी’ फक्त सोनी मराठीवर…

Read More »