Marathi Trends

नवरात्रीच्या फोटोशूटच्या तयारीसाठी तेजस्विनी पंडितला लागले 27 तास

Tejaswini Pandit

तेजस्विनी पंडितचे नवरात्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजतायत. हे फोटो पाहिल्यावर फोटो काढायच्या अगोदरची प्रचंड मेहनत लक्षात येतेय. नवरात्रीच्या दिवसांमध्ये एक कल्पना घेऊन त्याभोवती नऊ दिवसांचे फोटोशूट करण्याचा एक नवा ट्रेंड अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सुरू केलाय. असे फोटोशूट करण्याचे तेजस्विनीचे हे तिसरे वर्ष आहे. तेजस्विनी पंडित म्हणते, “पहिल्या वर्षी फोटोशूट …

Read More »

नवरी मिळे नवऱ्याला’, ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर

Navri mile navryaala

यंदा पावसाळा महाराष्ट्रावर पुरता बरसला असला, तरी मराठवाडा मात्र तहानलेला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मराठवाड्यात उद्भवली आहे एक नवी समस्या आणि ही समस्या आहे एका आईची.  लग्नाचं वय पार केलेल्या या आईच्या ४ मुलांसाठी काही केल्या मुलगी मिळत नाहीये.  सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या नवरी मिळे नवऱ्याला या नव्या मालिकेतून ही समस्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. आता तरी ठरलं पाहिजे, घर सुनांनी भरलं पाहिजे, एवढीच इच्छा असणाऱ्या या माउलीला मराठवाड्यातली परिस्थिती काही साथ देत नाही. एकीकडे नंदी बैलानं डोलावलेली नकारार्थी मान तर दुसरीकडे विवाह संस्थेकडून आलेला नकार, हे सगळं पचवून या वर्षी आपल्या मुलांची लग्नं करणारच, असा निश्चय तिनं केला आहे. सामाजिक समस्या विनोदी शैलीनं मांडण्यात हातखंडा असणारे दिग्दर्शक समीर पाटील या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. समीर पाटील यांनी मांडलेली या आईची व्यथा पाहताना धमाल येणार, हे नक्की. तेव्हा सूनबाई येती घरा, तोची दिवाळीदसरा अशी अवस्था झालेल्या या आईची सासूबाई होण्याची इच्छा कधीआणि कशी? पूर्ण होणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ७ ऑक्टोबर पासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर.

Read More »

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मध्ये येत्या २२ नोव्हेंबरला सई ताम्हणकर उचलतेय एक धाडसी पाऊल

Kulkarni Chaukatla Deshpande FIRST-LOOK

  आपल्या सर्वांच्या आयुष्यात ‘नाती’ या शब्दाला खूप वजन आहे आणि त्याहून जास्त वजनदार आहे ते म्हणजे नाती सांभाळण्याची जबाबदारी. पण नाती खरंच तितकी महत्त्वाची असतात? प्रत्येक नात्याची जबाबदारी सांभाळणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं का? आयुष्याच्या वळणावर येणा-या वेगळ्या नात्यांचा प्रवास उलगडवणारा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा मराठी चित्रपट यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ मधून एक …

Read More »

Khichik Marathi Movie Review

Khichik Movie Review

Khichik Movie Review : Director – Pritam SK Patil Star cast – Anil Dhakate,Yash Khond,Siddharth Jadhav,Prathamesh Parab,Sudesh Beri Writer – Pritam SK Patil Producer – Sachin A Dhakate Music – Dutta Gunjal Photography – Yogesh Koli Rating – 3.0 Plot The film is about a villager who takes a young …

Read More »

‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर बॉलिवूड सिनेमा ‘मलंग’ मध्ये दिसणार अमृता खानविलकर

amruta khanvilkar

अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडीयावर सुपर ऍक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री कोण असं जरी विचारलं तरी क्षणात अनेकांचं अचूक उत्तर असेल ‘अमृता खानविलकर’. मराठी इंडस्ट्रीमध्ये अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्ये देखील होत असते. अमृताने साकारलेल्या प्रत्येक भूमिका आणि तिचे डायलॉग्स तिच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ असतात. आणि आता यामध्ये नव्याने भर पडणार आहे कारण अमृताचा नवीन सिनेमा लवकरच येतोय. विशेष म्हणजे ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर अमृताला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या सिनेमातील स्टार कास्ट आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अमृताची ‘मलंग’ झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील यात शंका नाही. मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केले आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती अमृताला वारंवार तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन मिळत राहिल्या आहेत आणि पुढेही मिळतील हे नक्की.

Read More »

MX Player brings viewers two slice of life Marathi Originals – Pandu and Once A Year with #WeekendBingeOnMX

Pandu and Once A Year Web Series

Pandal visits, yummy modaksand blessings that last a lifetime – after all the fun of the 10 days of Ganesh Utsav, it is time to unwind at home with a show that we can relate to, binge on and laugh along with – all at the very same time. With …

Read More »

अभिनेत्री स्मिता तांबे स्वहस्ते ‘ट्रि-गणेशा’ बनवून साजरा करते इको फ्रेंडली गणेशोत्सव!

Smita Tambe

अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी सात दिवस गणेशोत्सव साजरा होतो. गणेशापाठोपाठच गौरींचेही आगमन होते. जेवढ्या मन लावून आपल्या प्रत्येक भूमिका स्मिता रंगवते, तेवढ्याच तन्मयतेने ती आपल्या लाडक्या बाप्पाचे आपल्या घरी आगत-स्वागत करते. स्मिताच्या घरी बाहेरून गणेशमुर्ती विकत आणली जात नाही, तर घरच्याघरी गणपतीची मुर्ती घडवून तिचा साजशृंगार करण्यापासून ते नैवेद्य आणि …

Read More »

शिवानी सुर्वेचे महाराष्ट्रभरातले फॅन्स साजरा करतायत तिचा आज वाढदिवस

Shivani Surve Bday

  बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील फायटर शेरनी शिवानीचा २८ ऑगस्टला वाढदिवस असतो. बर्थडेच्या दिवशी शिवानी बिग बॉसच्या घरात असली तरी तिचे चाहते महाराष्ट्रभर तिचा वाढदिवस दणक्यात साजरा करत आहेत. फॅन्सचं शिवानीवर असलेलं प्रेम थक्क करणारं आहे. आपल्या आवडत्या शिवानीचा वाढदिवस स्पेशल व्हावा म्हणून खूप नाविन्यपूर्ण पद्धतींनी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. …

Read More »

अभिनेता अंकुश चौधरीने शिवानी सुर्वेला दिल्या वाढदिवसाच्या ट्रिपल शुभेच्छा

Triple seat

बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वातील स्ट्राँग कंटेस्टंट शिवानी सुर्वेचा 28 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. बिग बॉस मराठीच्या दूस-या पर्वातली स्ट्राँग कंटेस्टंट असलेल्या शिवानीला सध्या तिचे महाराष्ट्रभरातले फॅन्स वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतानाच तिच्यासाठी महाराष्ट्राच्या सुपरस्टारने दिलेल्या शुभेच्छा खूप खास आहेत. महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरीने शिवानी सुर्वेला वाढदिवसाच्या आणि बिग बॉस मराठी सिझनची …

Read More »

आरोह वेलणकरला मिळतोय फिनालेसाठी प्रेक्षकांचा पाठिंबा

अभिनेता आरोह वेलणकरने वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात २० जुलैला दणक्यात प्रवेश केला. कमी वेळातच आरोहने सगळ्यांची मने जिंकत टॉप ६ मध्ये बाजी मारली. आरोह वेलणकरचा स्पष्टवक्ता स्वभाव आणि बुद्धीचातुर्य वापरून खेळायची वृत्ती यामुळे अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांची वाहवाही मिळवली. आरोहने टॉप ६ मध्ये एन्ट्री केल्यापासून सध्या सोशल मिडीयावरून त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतआहेत. आरोह वेलणकरच्या सोशल मिडीयावर …

Read More »